अशक्य ते शक्य! ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणार सुनील ग्रोव्हर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 03:26 PM2019-02-20T15:26:53+5:302019-02-20T15:30:34+5:30

कपिल शर्मा व सुनील ग्रोव्हर यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची इच्छा असलेल्या चाहत्यांसाठी एक खास खबर आहे. होय, गेल्या दीड वर्षांत जे काही झाले, त्यावरून कपिल व सुनील आता कधीच एकत्र येणार नाहीत, असेच अनेकांना वाटले. पण ...

salman khan to reunite sunil grover and kapil sharma again on the kapil sharma show | अशक्य ते शक्य! ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणार सुनील ग्रोव्हर!!

अशक्य ते शक्य! ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणार सुनील ग्रोव्हर!!

googlenewsNext
ठळक मुद्देविमानातील भांडणानंतर सुनीलने कपिलच्या शोमधून अंग काढून घेतले होते. आता मात्र प्रमोशनच्या निमित्ताने का होईना कपिलच्या शोमध्ये तो परतणार आहे. चाहत्यांसाठी यापेक्षा आनंदाची बातमी होऊ शकते.

कपिल शर्मा व सुनील ग्रोव्हर यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची इच्छा असलेल्या चाहत्यांसाठी एक खास खबर आहे. होय, गेल्या दीड वर्षांत जे काही झाले, त्यावरून कपिल व सुनील आता कधीच एकत्र येणार नाहीत, असेच अनेकांना वाटले. पण सलमानने मात्र हे करून दाखवले. होय, सलमानमुळे कपिल व सुनील यांच्यातील वाद मावळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत आणि याचमुळे टीव्हीवरच्या या लोकप्रिय जोडीला एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छाही पूर्ण होणार आहे.


ताज्या बातमीनुसार, सुनील ग्रोव्हर लवकरच कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार आहे. अर्थात परफॉर्मर म्हणून नव्हे तर आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो या शोमध्ये हजेरी लावणार आहे. यावेळी खुद्द सलमान खानही त्याच्यासोबत असणार आहे. सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’ यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय. काहीच दिवसांत या चित्रपटाचे प्रमोशन सुरू होईल आणि याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान आणि सुनील कपिलच्या शोमध्ये सहभागी होतील.


तुम्हाला ठाऊक असेलच की, ‘भारत’मध्ये सुनील ग्रोव्हर एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. शिवाय सलमान खान ‘द कपिल शर्मा शो’चा निर्माता आहे. त्यामुळे कपिल व सुनील दोघेही सलमानच्या जवळ आहेत. तूर्तास तरी सलमानचा शब्द टाळून त्याची नाराजी ओढवून घेणे कपिल व सुनील दोघांनाही परवणारे नाही.
विमानातील भांडणानंतर सुनीलने कपिलच्या शोमधून अंग काढून घेतले होते. आता मात्र प्रमोशनच्या निमित्ताने का होईना कपिलच्या शोमध्ये तो परतणार आहे. चाहत्यांसाठी यापेक्षा आनंदाची बातमी होऊ शकते.

Web Title: salman khan to reunite sunil grover and kapil sharma again on the kapil sharma show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.