ठळक मुद्दे तू ‘बिग बॉस’चे १३ वे सीझन होस्ट करणार नाहीस,अशी चर्चा आहे, हे खरे आहे का? असा प्रश्न सलमानला यावेळी विचारण्यात आला.

तुम्ही ‘बिग बॉस’चे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, गेल्या अनेक वर्षांपासून टीव्हीचा सर्वांत मोठा रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय. ‘बिग बॉस’चे प्रत्येक सीझन संपले की,लगेच नव्या सीझनची चर्चा सुरु होते. पाठोपाठ हे नवे सीझन कोण होस्ट करणार, याचीही चर्चा रंगते. येत्या काळात ‘बिग बॉस’चे १३ सीझन प्रेक्षकांसमोर असणार आहे आणि हे १३ वे सीझन कोण होस्ट करणार, याची चर्चा सुरु झाली आहे. ‘बिग बॉस 13’ कोण होस्ट करणार, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आता त्याचे उत्तर कन्फर्म आहे. होय, यंदाचे १३ वे सीझनही सलमान खान हाच होस्ट करणार आहे.

अलीकडे पिंकविलासोबत बोलताना सलमानने खुद्द हे जगजाहीर केले. तू ‘बिग बॉस’चे १३ वे सीझन होस्ट करणार नाहीस,अशी चर्चा आहे, हे खरे आहे का? असा प्रश्न सलमानला यावेळी विचारण्यात आला. यावर ‘काश, ये सच होता,’असे उत्तर सलमानने दिले. तो इथेच थांबला नाही तर १३ वे सीझनही मीच होस्ट करणार आहे, असे त्याने सांगितले.

‘बिग बॉस’चा फॉर्मेट तुला आवडतो का? असे विचारले असता तो म्हणाला की, ‘ मला हा फॉर्मेट आवडत नाही. पण एंडेमॉल व कलर्स लोकांना निवडून त्यांना एका घरात बंद करणे आवडते.  घरात बंद असलेले लोक एकमेकांसोबत डिल करतात. या लोकांसोबत मग मलाही डिल करावे लागते. कधी कधी मला मजा येते. पण कधीकधी मला वैताग येतो. अगदी वैताग. अर्थात मला या शोमधून खूप काही शिकायला मिळते.’


Web Title: salman khan confirmed that he will only host bigg boss season 13
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.