Ronit Roy to appear in a special cameo to introduce new Mr Bajaj on Kasautii Zindagii Kay! | रोनित रॉय पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार 'या' मालिकेत !
रोनित रॉय पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार 'या' मालिकेत !

ठळक मुद्देरोनित रॉय एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे

स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेत आता लवकरच मिस्टर. बजाज या गाजलेल्या व्यक्तिरेखेचा प्रवेश होणार आहे. या मालिकेतील मिस्टर. बजाज हे एक महत्त्वाचे आणि अविभाज्य व्यक्तिरेखा असून ही भूमिका कोणता अभिनेता साकारणार आहे, त्याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. मूळ मालिकेत ही भूमिका रोनित रॉय या अभिनेत्याने जशी साकारली होती, त्यामुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. या भूमिकेने रोनित रॉयच्या करिअरला यशाच्या शिखरावर नेले.  आता या नव्या मालिकेत मिस्टर. बजाज या व्यक्तिरेखेची ओळख करून देण्यासाठी रोनित रॉय एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

मालिकेशी संबंधित सूत्रांनी सांगितले, “मिस्टर. बजाज यांची व्यक्तिरेखा ही या मालिकेतील एक मध्यवर्ती भूमिका असून पूर्वी रोनित रॉयने ती अतिशय अचूकतेने उभी केली होती. आता या व्यक्तिरेखेची ओळख करून देण्यासाठी रोनित रॉयने या मालिकेत एखादी छोटीशी भूमिका साकारावी, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. तो जर मालिकेत दिसला, तर प्रेक्षकांच्या मनात त्याच्या पूर्वीच्या स्मृती जाग्या होतील.”

स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेत पुन्हा एकदा रोनित रॉय दिसला, तर त्याला पाहणे फारच मनोरंजक होईल. आता या नव्या मालिकेत या भूमिकेची माळ कोणत्या कलाकाराच्या गळ्यात पडते, त्याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


Web Title: Ronit Roy to appear in a special cameo to introduce new Mr Bajaj on Kasautii Zindagii Kay!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.