Rhea Sharma's mother surprises her on set | ‘ये रिश्ते है प्यार के’च्या सेटवर रियाला मिळाले सरप्राईज!
‘ये रिश्ते है प्यार के’च्या सेटवर रियाला मिळाले सरप्राईज!

ठळक मुद्देरिया शर्माने ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी भरपूर मेहनत घेतलीययाच्या आईने  मालिकेच्या सेटवर अनपेक्षितपणे भेट घेऊन तिला सरप्राईज दिले

स्टार प्लसवरील ‘ये रिश्ते है प्यार के’ ही मालिका नातेसंबंध, विवाह आणि कौटुंबिक संबंध यावर भाष्य करते. या मालिकेतून पुरोगामी विचार मांडण्यात आले आहेत. या मालिकेनं  अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेची कथा आपल्या जीवनसाथीची निवड विचारपूर्वक घेण्यावर आधारीत आहे. मालिकेचे कथानक आपला ‘जो़डीदार निवडणे हा विचारपूर्वक घ्यावयाचा निर्णय असून त्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे,’ या संकल्पनेभोवती गुंफण्यात आले आहे. 

 मिष्टीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिया शर्माने ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी भरपूर मेहनत घेतलीय. रियाच्या आईने  मालिकेच्या सेटवर अनपेक्षितपणे भेट घेऊन तिला सरप्राईज दिले.

रियाच्या जवळचे संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, “मालिकेच्या आगामी भागांत प्रेक्षक वेगवेगळ्या भावभावनांच्या हिंदोळ्यांवर झुलणार असून हे प्रसंग उभे करण्यासाठी रियाला तिची व्यक्तिरेखा जाणून घेण्यासाठी काही मानसिक तयारी करावी लागणार होती. या प्रसंगांसाठी आपल्या मुलीला भावनिक आधाराची गरज भासेल, हे लक्षात घेऊन तसंच आपल्या मुलीबरोबर काही काळ एकत्र व्यतीत करता यावा म्हणून तिची आई अचानक सेटवर आली. मालिकेतील हे भावपूर्ण प्रसंग चित्रीत होईपर्यंत तिची आई सेटवरच थांबून राहिली. आपल्या आईला सेटवर आल्याचं पाहून रियाया आनंदाने हरवून तर गेलीच, पण ती मनानेही मोकळी झाली.” 
 


Web Title: Rhea Sharma's mother surprises her on set
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.