Renuka Shahane tells that Supriya Pathak is my all-time favorite Lady Dawn | ​रेणुका शहाणे सांगतेय सुप्रिया पाठक माझ्या ऑल टाईम फेव्हरेट लेडी डॉन
​रेणुका शहाणे सांगतेय सुप्रिया पाठक माझ्या ऑल टाईम फेव्हरेट लेडी डॉन
लोकप्रिय बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री रेणुका शहाणे स्टार प्लसवरील आगामी शो खिचडीसह टेलिव्हिजनवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. रेणुका खिचडी या मालिकेत एका मराठी लेडी डॉनची भूमिका साकारणार आहे. ती या मालिकेत  हंसा म्हणजेच अभिनेत्री सुप्रिया पाठकला किडनॅप करणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेत काम करण्यास रेणुका खूप उत्सुक आहे. तिने या मालिकेत साकारलेली भूमिका तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी असल्याचे ती सांगते. 
खिचडी या मालिकेत रेणुका लेडी डॉनची भूमिका साकारत असल्याने खऱ्या आयुष्यात तिची आवडती लेडी डॉन कोण असे तिला विचारले असता ती सांगते, “माझी सर्वांत आवडती लेडी डॉन रामलीलामधील सुप्रिया पाठकच आहेत. खिचडीमध्ये त्यांच्यासोबत एकत्र काम करणे हा माझा सन्मानच आहे. खिचडीमधील त्यांची हंसा ही व्यक्तिरेखा माझी सगळ्यात आवडती व्यक्तिरेखा आहे. त्यांच्यासोबत मला काम करायला मिळाले याचा मला प्रचंड आनंद होत आहे. या मालिकेचे चित्रीकरण करताना मला खूप धमाल आली. मी स्वतः या मालिकेची प्रचंड मोठी चाहती आहे. या मालिकेचे निर्माते जे. डी. मजेठिया हे माझे खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी मला या मालिकेत काम करण्याविषयी विचारले असता मी क्षणात या मालिकेसाठी होकार दिला. अशाप्रकारची भूमिका मी कधीच साकारली नसल्याने या मालिकेत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. 

supriya pathak

२००४ मध्ये प्रसारित झालेली ‘खिचडी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय बनली, नंतर त्या मालिकेवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता ही मालिका नव्या स्वरूपात प्रसारित होणार आहे. ‘खिचडी’ या मालिकेतील राजीव मेहता, अनंग देसाई, वंदना पाठक तसेच सुप्रिया पाठक हे कलाकार नव्या आवृत्तीतही कायम ठेवण्यात आले आहेत. जुन्या कलाकारांप्रमाणे काही नवे कलाकार देखील आता या मालिकेचा भाग असणार आहेत. रेणुका शहाणे, सुनील ग्रोव्हर यांसारखे कलाकार आता खिचडीचा भाग असणार आहेत. 

Also Read : सुप्रिया पाठक खिचडी मालिकेच्या सेटवर का झाल्या भावुक?

Web Title: Renuka Shahane tells that Supriya Pathak is my all-time favorite Lady Dawn
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.