LockDown:म्हणून सलमान खानने शेअर केले कब्रस्तानचे फोटो, फोटो पाहून तुम्हीही व्हाल निशब्द !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 03:36 PM2020-04-11T15:36:13+5:302020-04-11T15:37:48+5:30

सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कोरोना वॉरियर्सला प्रोत्साहित करण्यासाठी 'दिल से थँक्यू' हा हॅशटॅग सोशल मीडियावर सुरु केला आहे.

For This Reason salman khan shared closed cemetery and empty road photos-SRJ | LockDown:म्हणून सलमान खानने शेअर केले कब्रस्तानचे फोटो, फोटो पाहून तुम्हीही व्हाल निशब्द !

LockDown:म्हणून सलमान खानने शेअर केले कब्रस्तानचे फोटो, फोटो पाहून तुम्हीही व्हाल निशब्द !

googlenewsNext

लॉकडाऊनमुळे सलमान खान आपल्या पनवेल फार्महाऊसमध्ये वेळ घालवत आहे. तो येथे काही दिवसांसाठी गेला होता पण लॉकडाऊननंतर तो त्याच्या मुंबईच्या घरी, गॅलेक्सी अपार्टमेंटला परतू शकला नाही आणि त्याला पनवेलमध्येच राहावे लागले. आता सलमानने फार्महाऊसमधूनच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून थोडावेळ तुम्ही  निशब्द झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सलमानने शेअर केले आहेत. बंद कब्रस्तानचे फोटो.

 

 या कब्रस्तानाच्या आसपास शांतता असलेली दिसत आहे. कब्रस्तानकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचं सलमाननं कौतुक केलं आहे. सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य पाहता कब्रस्तान बंद केल्याबद्दल सलमाननं त्यांचे आभार मानले आहे.कब्रस्तान बंद करण्याच्या या निर्णयाचं लोक खूप कौतुक करताना दिसत आहेत आणि कोरोना व्हायरसच्या या संकटात एकजूट दाखवल्याबाबत आभारही मानताना दिसत आहेत.


फार्म हाऊसवर सध्या सलमानसोबत त्याची आई, बहीण, भाचे आणि काही मित्रमंडळी आहेत. पण सलमानचे वडील ज्येष्ठ लेखक सलीम खान वांद्रे येथील त्यांच्या घरी एकटेच आहेत. तो त्याच्या वडिलांना प्रचंड मिस करत असून दिवसांतून कित्येक वेळा तो व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी गप्पा मारतो.

तसेच सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कोरोना वॉरियर्सला प्रोत्साहित करण्यासाठी 'दिल से थँक्यू' हा हॅशटॅग सोशल मीडियावर सुरु केला आहे. सर्व पोलिस, महापालिका कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, सरकारी अधिकारी, विक्रेते आणि बिल्डिंगच्या सुरक्षारक्षकांचे आभार व्यक्त करण्याची अपील केली होती. ज्यानंतर बॉलिवूडच्या अनेक सेलेब्सनी त्यांचा फोटो #DilSeThankYou सह शेअर केला आहे.

Web Title: For This Reason salman khan shared closed cemetery and empty road photos-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.