ठळक मुद्देप्रल्हादचे लग्न अंजली कानडेसोबत मे २०१७ मध्ये झाले असून अंजली ही योगा प्रशिक्षक आहे. त्याच्या फेसबुक अकाऊंटला त्याच्या पत्नीचे फोटो पाहायला मिळतात. त्याचसोबत त्यांच्या लग्नाच्यावेळेसचा फोटो अभिनेता सुयश टिळकने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या सिझनला सध्या प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेतील अण्णा, शेवंता, दत्ता, सविता, काशी, वच्छी, पांडू या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेत काशीचा नुकताच मृत्यू झाला असून आता या मालिकेत आता पुढे काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले असून या मालिकेला टिआरपी देखील खूपच चांगला आहे.

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या पहिल्या सिझनला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. अण्णांच्या घरात खरंच भूत आहे की कोणी घरातील सगळ्यांना उगाचच घाबरवत आहे हे गूढ मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत टिकून होते. या मालिकेतील काही कलाकार सध्या रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये देखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दोन्ही सिझनमध्ये आपल्याला पांडूची भूमिका पाहायला मिळत आहे. हा पांडू खुळा असून प्रत्येक गोष्ट विसरतो आणि इसरलो... असे म्हणत त्याची कबुली देखील देतो. त्यामुळे हा भोळा पांडू प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. रात्रीस खेळ चाले या मालिकेत पांडूची भूमिका प्रल्हाद कुडतडकरने साकारली आहे. 

प्रल्हाद हा खूप चांगला अभिनेता आहे हे आपल्याला रात्रीस खेळ चाले या मालिकेचे दोन्ही सिझन पाहिल्यावर लक्षात येतच आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, हा प्रल्हाद हा खूप चांगला कलाकार असण्यासोबतच त्याच्यात आणखी एक खुबी आहे.

प्रल्हाद खूप चांगले लेखन करत असून तोच या मालिकेचा लेखक आहे. त्याने या शिवाय देखील काही मालिकांचे लेखन केले आहे. प्रल्हादने कॉलेज जीवनात अनेक एकांकिकांसाठी पारितोषिकं देखील मिळवली आहेत. 

प्रल्हादचे लग्न अंजली कानडेसोबत मे २०१७ मध्ये झाले असून अंजली ही योगा प्रशिक्षक आहे. त्याच्या फेसबुक अकाऊंटला त्याच्या पत्नीचे फोटो पाहायला मिळतात. त्याचसोबत त्यांच्या लग्नाच्यावेळेसचा फोटो अभिनेता सुयश टिळकने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. 


Web Title: Ratris Khel chale pandu aka pralhad kudtarkar's real life wife picture
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.