नाईक आहेत ते, परत येणारच...! ‘अण्णा’ला पाहून लोकलच्या प्रवाशांना फुटला घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 05:13 PM2021-03-16T17:13:01+5:302021-03-16T17:15:32+5:30

‘रात्रीस खेळ चाले 3’चा प्रोमो, पाहा व्हिडीओ

ratris khel chale 3 new new promo viral on social media | नाईक आहेत ते, परत येणारच...! ‘अण्णा’ला पाहून लोकलच्या प्रवाशांना फुटला घाम

नाईक आहेत ते, परत येणारच...! ‘अण्णा’ला पाहून लोकलच्या प्रवाशांना फुटला घाम

googlenewsNext
ठळक मुद्दे‘रात्रीस खेळ चाले’च्या पहिल्या आणि दुस-या भागातील अनेक कलाकार या तिस-या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिस-या भागात एंट्री होणार आहे.

रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार याची घोषणा झाल्यापासून ही मालिका कधीपासून सुरू होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.  
या मालिकेचे दोन्ही भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडले. अगदी मालिकेतील पात्र आणि ही पात्र साकारणा-या कलाकारांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.  दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.  मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच ‘रात्रीस खेळ चाले 2’ प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला होता. आता ‘रात्रीस खेळ चाले 3’ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.  तूर्तास या तिसºया सीझनच्या प्रोमोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

अण्णा नाईक परत येणार..असे प्रोमोज सध्या झी मराठीवर झळकतायत. आता एक नवा प्रामो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतोय. मुंबईच्या लोकलमधला हा प्रोमो चांगलाच धडकी भरवणारा आहे. रात्रीच्या अंधारात लोकल धडधडत येते. प्रवासी लोकलमध्ये बसतात. आत पाहतात काय, तर डब्यात सर्वत्र अण्णा नाईक परत येणार..., असे लिहिलेले दिसते. प्रवासी याची खिल्ली उडवताना दिसतात. पण तितक्यात खिडकीत साक्षात अण्णा नाईक दिसतो. त्यांचा तो चेहरा पाहून सगळ्यांचीच बोबडी वळते.

‘रात्रीस खेळ चाले’च्या पहिल्या आणि दुस-या भागातील अनेक कलाकार या तिस-या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिस-या भागात एंट्री होणार आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुस-या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत.

Web Title: ratris khel chale 3 new new promo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.