हा चिमुरडा साकारतोय रात्रीस खेळ चाले 3 मध्ये महत्त्वाची भूमिका, ओळख पाहू कोण आहे तो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 06:00 AM2021-04-25T06:00:00+5:302021-04-25T06:00:03+5:30

हा चिमुरडा रात्रीस खेळ चाले 3 मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. त्याने रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दोन्ही भागात काम केले होते.

ratris khel chale 3 fame sainkeet kamat childhood picture | हा चिमुरडा साकारतोय रात्रीस खेळ चाले 3 मध्ये महत्त्वाची भूमिका, ओळख पाहू कोण आहे तो?

हा चिमुरडा साकारतोय रात्रीस खेळ चाले 3 मध्ये महत्त्वाची भूमिका, ओळख पाहू कोण आहे तो?

googlenewsNext
ठळक मुद्देरात्रीस खेळ चाले मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर आता या मालिकेचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

सोशल मीडियावर अनेक कलाकार आपल्या चाहत्यांसाठी त्यांचे अनेक फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. आता एका चिमुकल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून हा चिमुरडा रात्रीस खेळ चाले 3 मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. त्याने रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दोन्ही भागात काम केले होते.

रात्रीस खेळ चाले मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर आता या मालिकेचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या मालिकेच्या तिसऱ्या सीझनने देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेत एकेक पात्रांची एन्ट्री होत आहेत. प्रेक्षकांमध्ये सध्या अभिराम आणि अभिरामच्या पत्नीची चांगलीच चर्चा रंगली आहे. या दोघांचीही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे.

रात्रीस खेळ चाले 3 मध्ये अभिरामच्या भूमिकेत साईंकित कामत दिसत आहे. साईंकित सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असून तो त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याने नुकताच त्याच्या बहिणीसोबतचा त्याचा एक लहानपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तू लहानपणी देखील तितकाच क्यूट दिसायचास असे त्याचे चाहते त्याला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. 

Web Title: ratris khel chale 3 fame sainkeet kamat childhood picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.