ratris khel chale 2 shobha aka Mangal Rane real life pictures | ओळखा पाहू... रात्रीस खेळ चाले २ मध्ये कोणती व्यक्तिरेखा साकारतेय ही अभिनेत्री?
ओळखा पाहू... रात्रीस खेळ चाले २ मध्ये कोणती व्यक्तिरेखा साकारतेय ही अभिनेत्री?

ठळक मुद्देरात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शोभा ही भूमिका मंगल राणे साकारत आहे. मंगल या मालिकेत नेहमीच आपल्याला साड्यांमध्ये पाहायला मिळते. पण तुम्हाला माहीतेय का, खऱ्या आयुष्यात मंगल खूपच वेगळी आहे.

रात्रीस खेळ चाले ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू, सरिता या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहाता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच रात्रीस खेळ चाले २ प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला. रात्रीस खेळ चाले प्रमाणेच ही मालिका देखील एक गुढ मालिका आहे. या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखांना चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे.

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत काशीचा नुकताच मृत्यू झाला असून आता या मालिकेत पुढे काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले असून या मालिकेला टिआरपी देखील खूपच चांगला आहे. काशीच्या मृत्यूनंतर आता अण्णा आणि त्याच्या कुटुंबियांसोबत बदला घ्यायचा असे वच्छी आणि शोभाने ठरवले आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न देखील करत आहेत. या मालिकेत वच्छी आणि शोभाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शोभा ही भूमिका मंगल राणे साकारत आहे. मंगल या मालिकेत नेहमीच आपल्याला साड्यांमध्ये पाहायला मिळते. पण तुम्हाला माहीतेय का, खऱ्या आयुष्यात मंगल खूपच वेगळी आहे. ती अनेक वेळा पाश्चिमात्य कपडे घालते. तिचे खऱ्या आयुष्यातील फोटो पाहिल्यानंतर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शोभाची भूमिका साकारणारी मुलगी हीच आहे का असा प्रश्न नक्कीच पडतो. 

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या पहिल्या सिझनला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. अण्णांच्या घरात खरंच भूत आहे की कोणी घरातील सगळ्यांना उगाचच घाबरवत आहे हे गूढ मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत टिकून होते. या मालिकेच्या या दुसऱ्या भागाची कथा देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. 


Web Title: ratris khel chale 2 shobha aka Mangal Rane real life pictures
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.