ratris khel chale 2 Sarita aka Prajakta Wadaye is unrecognizable in her real life look | रात्रीस खेळ चाले 2 मध्ये ही अभिनेत्री साकारतेय महत्त्वाची भूमिका... ओळखा पाहू कोण आहे ती?
रात्रीस खेळ चाले 2 मध्ये ही अभिनेत्री साकारतेय महत्त्वाची भूमिका... ओळखा पाहू कोण आहे ती?

ठळक मुद्देया मालिकेत सरिता ही भूमिका प्राजक्ता वाडिये ही अभिनेत्री साकारत आहे. सरिता ही मालिकेत नेहमीच भारतीय पेहरावात आपल्याला पाहायला मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का, खऱ्या आयुष्यात प्राजक्ताला भारतीय कपड्यांसोबत पाश्चिमात्य कपडे देखील परिधान करायला आवडतात.

रात्रीस खेळ चाले ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू, सरिता या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहाता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच रात्रीस खेळ चाले 2 प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला. रात्रीस खेळ चाले प्रमाणेच ही मालिका देखील एक गुढ मालिका आहे. या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखांना चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे.

रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेत नुकतेच दत्ताचे लग्न झालेले आपल्याला पाहायला मिळाले. सरिता ही अतिशय गरीब कुटुंबातील असून अण्णांनी आपल्या स्वार्थासाठी तिचे आणि दत्ताचे लग्न करून दिले आहे. सरिताचे लग्न झाल्यानंतर आता पाच परतावनाचा कार्यक्रम सुरू आहे. सरिता ही अतिशय साधी असून नेहमीच साड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या मालिकेत सरिता ही भूमिका प्राजक्ता वाडिये ही अभिनेत्री साकारत आहे. सरिता ही मालिकेत नेहमीच भारतीय पेहरावात आपल्याला पाहायला मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का, खऱ्या आयुष्यात प्राजक्ताला भारतीय कपड्यांसोबत पाश्चिमात्य कपडे देखील परिधान करायला आवडतात. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिनेच तिच्या फेसबुकच्या अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर हीच सरिता आहे का प्रश्न सगळ्यांना पडत आहे. प्राजक्ताचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

प्राजक्ताने रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेत काम करण्याआधी काही नाटकांमध्ये काम केले आहे. झी युवावरील गर्ल्स हॉस्टेल या मालिकेत देखील ती झळकली होती. रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. प्रेक्षक तिला आता सरिता या नावानेच ओळखू लागले आहेत. पण खऱ्या आयुष्यात सरिता इतकी वेगळी दिसते की, तिला ओळखणे तिच्या फॅन्सना कठीण जाणार यात काहीच शंका नाही.


Web Title: ratris khel chale 2 Sarita aka Prajakta Wadaye is unrecognizable in her real life look
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.