रात्रीस खेळ चाले २’ मालिका एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसेच या दुसऱ्या भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. कुठलेही प्रथितयश कलाकार नसतानाही या मालिकेतील व्यक्तिरेखा घराघरांत लोकप्रिय ठरल्या. ‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेत वच्छीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीवनी पाटील अल्पावधीतच लोकप्रिय झाली. नकारात्मक भूमिका असलेली वच्छीची व्यक्तिरेखा अगदी खरी वाटावी इतक्या सहजपणे संजीवनी ती साकारते.

वच्छीच्या व्यक्तिरेखेसोबतच तिचा डान्स देखील तितकाच लोकप्रिय होत आहे. स्वतःच्या मुलाच्या, काशीच्या वरातीत वच्छीचा डान्स सर्व प्रेक्षकांनी पाहिला आणि सगळ्यांना आवडला देखील. सोशल मीडियावर डान्सवरून बरेच मीम्ससुद्धा व्हायरल झाले. या डान्समध्ये वेगवेगळे भाव-भावना दडल्या आहेत. 


अभिनेत्री संजीवनी पाटिल हिने एका मराठी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, या मालिकेत काशीच्या वरातीत वच्छी एकटीच नाचणार असते. त्यामुळे तिच्या डान्स दमदार झाला पाहिजे. तसेच तिचा वरातीतला डान्सदेखील असा झाला पाहिजे जो संपूर्ण गाव व अण्णा नाईकांच्या लक्षात राहिला पाहिजे. वच्छीच्या या वरातीच्या डान्स सीनसाठी दिग्दर्शकापासून संपूर्ण टीम उत्साहाने कामाला लागली होती. त्याचा उत्साह पाहून मीही उत्स्फुर्त झाली आणि नॅचरली डान्स केला. कोरियोग्राफर शिवाय हा डान्स झाला.

मी एक डान्सर आहे. त्यामुळे वच्छाच्या डान्समधून माझ्यातील डान्सर जागा झाला. तसेच या डान्समधील स्टेपमध्ये आनंद व राग ती व्यक्त करत असल्याचे संजीवनीने सांगितले.


वच्छीचा वरातीतला हा डान्स चांगलाच. मालिकेत येत्या काही दिवसांत प्रेक्षकांना काही वेगळ्या गोष्टी पहायला मिळणार आहेत.


Web Title: Ratris Khel Chaale 2 Vacchi Dance step have some emotions
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.