ठळक मुद्देहार्दिक आता प्रेक्षकांना डॅशिंग अंदाजात पाहायला मिळत असून कुस्ती खेळणारा हार्दिक आता चक्क चोर बनला आहे. त्याचे नाव राजा राजगोंडा असून त्याला सगळे आर आर म्हणून ओळखतात.

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील राणा दा आणि अंजली यांची प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या मालिकेत नुकतेच एक धक्कादायक वळण आले आहे. प्रेक्षकांचा लाडका राणा दा म्हणजेच हार्दिक जोशीची मालिकेतून एक्झिट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. या मालिकेचे कथानक आता दोन वर्षं पुढे गेले असून राणा दाचे निधन झाल्याचे त्याच्या घरातल्यांना वाटत आहे. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हार्दिकने मालिकेतून एक्झिट घेतल्यामुळे त्याचे फॅन्स देखील नाराज झाले आहेत. पण आता हार्दिकच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. या मालिकेत त्याचा आता एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोत हार्दिक आता प्रेक्षकांना डॅशिंग अंदाजात पाहायला मिळत असून कुस्ती खेळणारा हार्दिक आता चक्क चोर बनला आहे. त्याचे नाव राजा राजगोंडा असून त्याला सगळे आर आर म्हणून ओळखतात. मारामारी करणारा जीन्स, टी-शर्ट आणि गॉगलमधील हार्दिक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या टीमला खात्री आहे आणि विशेष म्हणजे नव्या लूकमध्ये हार्दिकच्या मिशीची स्टाईल देखील वेगळी आहे. 

हार्दिकने इन्स्टाग्रामवर मालिकेच्या प्रोमोचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर केवळ १६ तासात ४० हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. मालिकेत हार्दिकची रिएंट्री होत असल्याने त्याचे फॅन्स प्रचंड खूश असल्याचे ते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

तुझ्यात जीव रंगला ही मालिका आज घरोघरी पोहोचली आहे. राणा दा म्हणजेच हार्दिक जोशीला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या या नवीन भूमिकेला देखील त्याच्या फॅन्सची पसंती मिळेल यात काहीच शंका नाही. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजली आणि राणा दा यांच्या शिवाय बरकत, नंदिता, चंदे ही पात्रे देखील लोकप्रिय झाली आहेत. 


Web Title: Rana da Aka Hardik Joshi reentry in zee marathi's Tujhyat Jeev Rangala
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.