Rakhi Sawant writes 'I Love Abhinav' All Over Her Body | अभिनवच्या प्रेमात आकंठ बुडाली राखी, घरात घातला धुमाकुळ

अभिनवच्या प्रेमात आकंठ बुडाली राखी, घरात घातला धुमाकुळ

बिग बॉस १४ मध्ये राखीची एंट्री झाल्यापासून शो अधिक रंजक बनला आहे. पण कुटेतरी राखी भरकट असल्याचे तिच्या चाहत्यांनी आणि शोच्या निर्मात्यांनीही वाटत आहे. एंटरटेंमेंटचा फुल पॅकेज असणारी राखी मध्येच भावूक होते. त्यामुळे राखी जास्त घरात एंटरटेनिंग वाटत नाही. त्यामुळे आता खुद्द शोच्या निर्मात्यांनीच राखीसाठी नवीन शक्कल लढवल्याचे दिसतंय.

 

नुकताच 'बिग बॉस १४' प्रोमो समोर आला आहे. यात पहिल्यांदाच राखी इतक्या बोल्ड स्वरुपात ऑनस्क्री झळकणार आहे. विशेष म्हणजे तिच्या संपूर्ण अंगावर ती अभिनवसाठी तिचे किती प्रेम आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र राखीचे अभिनवसाठी असणारे प्रेम अभिनवची पत्नी रूबीना दिलैकला मात्र मान्य नाही. राखी घरात अभिवचे प्रेम मिवण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक वेगळीच खेळी खेळताना दिसणार आहे. हे पाहून राखी पुन्हा एकदा ड्रामेबाज बनल्या असल्याचे तुम्हाला जाणवेल. कुठेतरी तिच्या नौटंकीसाठी ओळखली जाणारी राखी घरात कुठेतरी तिची जादू फिकी पडत होती. आता राखीचा तोच अंदाज पाहायला मिळणार असल्यामुळे राखीचा हा अंदा रसिकांचे कितपत मनोरंजन करुन जातो हे पाहणे रंजक असणार आहे. 

त्याने मला धमकी दिली म्हणून मी लग्न केले...! राखी सावंत शॉकिंग खुलासा

बिग बॉसच्या घरात एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली गेली. मीडियाच्या पत्रकारांनी घरातील सदस्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. नेहमीप्रमाणे या एपिसोडचे आकर्षण ठरली ती राखी सावंत. ‘मीडिया की बेटी’ मानल्या जाणा-या राखीने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरेच दिली नाही तर आपल्या उत्तराने सर्वांचे मनोरंजनही केले.तुझ्या लग्नाची इतकी चर्चा का होते? तू खरंच लग्न केले की हा सगळा ड्रामा आहे? असा प्रश्न राखीला यावेळी विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राखीने कधी नव्हे असा खुलासा केला. होय, तिच्या या खुलाशाने सगळ्यांना धक्का बसला. मी विवाहित आहे आणि पतीची प्रतीक्षा करत आहे. माझ्या आयुष्यात काही अडचणी होत्या आणि म्हणून मला लग्न करावे लागले असे राखी म्हणाली. पुढे तिने जे काही सांगितले ते ऐकून तर सगळेच हैराण झालेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rakhi Sawant writes 'I Love Abhinav' All Over Her Body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.