इथंही फिक्सिंग? राखी सावंतनं शो सुरू होण्याआधीच सांगितलं ‘खतरों के खिलाडी 11’च्या विजेत्याचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 12:37 PM2021-05-09T12:37:12+5:302021-05-09T12:39:23+5:30

Khatron Ke Khiladi 11 : होय, या शोचा विजेता कोण होणार, हे निर्मात्यांनी आधीच ठरवले असल्याचा शॉकिंग दावा राखीने केला आहे. या विजेत्याचे नावही राखीने जाहिर केले आहे.

rakhi sawant predicted abhinav shukla as winner of khatron ke khiladi 11 | इथंही फिक्सिंग? राखी सावंतनं शो सुरू होण्याआधीच सांगितलं ‘खतरों के खिलाडी 11’च्या विजेत्याचं नाव

इथंही फिक्सिंग? राखी सावंतनं शो सुरू होण्याआधीच सांगितलं ‘खतरों के खिलाडी 11’च्या विजेत्याचं नाव

Next
ठळक मुद्देराहुल वैद्यबद्दल बोलताना राखीने त्याची चांगलीच खिल्ली उडवली.

छोट्या पडद्यावरचा ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi 11) या रिअ‍ॅलिटी शोचा 11 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. शोचे सगळे स्पर्धक दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनला पोहोचले आहेत. कोरोनामुळे सर्व स्पर्धकांना दक्षिण आफ्रिकेला नेऊन शो पुर्ण करण्याचा घाट घातला आहे. परंतु, अभिनेत्री राखी सावंतने  (Rakhi Sawant) शो पूर्ण होण्याआधी त्यातील हवा काढून टाकली आहे. होय, या शोचा विजेता कोण होणार, हे निर्मात्यांनी आधीच ठरवले असल्याचा शॉकिंग दावा राखीने केला आहे. या विजेत्याचे नावही राखीने जाहिर केले आहे.
अद्याप ‘खतरों के खिलाडी 11’च्या सर्व स्पर्धकांची यादी समोर आलेली नाही. पण अभिनव शुक्ला, राहुल वैद्य, निक्की तंबोली, श्वेता तिवारी, अर्जुन बिजलानी, वरूण सूद यांच्या नावांचा खुलासा मात्र झालाये. आता यापैकी कोण विजेता होणार? हे पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना असणारच. पण राखीने आधीच विजेत्याचे नाव सांगून खळबळ उडवली आहे.

पापाराझींनी राखीला ‘खतरों के खिलाडी’बद्दल विचारले आणि राखीने विजेत्याचे भाकीतही केले. तिच्या मते, हा शो अभिनव शुक्लाच जिंकणार.
‘ बिग बॉस सीझन 14 मध्ये अभिनवने  अनेक कठीण टास्क अगदी सहजपणे पूर्ण केले होते. तो खूप स्ट्राँग आहे. आकर्षक आहे आणि पट्टीचा राजकारणी देखील आहे. त्यामुळें तो कायम चर्चेत असतो अन् चर्चेत राहणारे स्पर्धकच जिंकतात. त्यामुळे अभिनव शुक्लाच जिंकेल,’ असे ती म्हणाली.

राहुल वैद्य का गेला, हेच मला कळत नाहीये...
राहुल वैद्यबद्दल बोलताना राखीने त्याची चांगलीच खिल्ली उडवली. राहुल वैद्य ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये का गेला, माहित नाही. आधीच त्याला पाठीचा त्रास आहे. अशात तो सुखरूप परत यावा, इतकीच प्रार्थना मी करते, असे ती म्हणाली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rakhi sawant predicted abhinav shukla as winner of khatron ke khiladi 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app