'खतरा खतरा खतरा' शोमध्ये 'दुल्हनिया' बनली राखी सावंत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 03:59 PM2019-09-03T15:59:54+5:302019-09-03T16:03:17+5:30

स्टेजवर राखी सावंतची एंट्री होताच शोचे होस्ट भारती आणि हर्ष यांनी त्यात आणखीन थोडा ट्विस्ट आणण्याचे ठरविले आणि राखीला एका क्विर्की टास्कमध्ये घेतले.

Rakhi Sawant ‘Bani Dulhaniya’ on COLORS' Khatra Khatra Khatra | 'खतरा खतरा खतरा' शोमध्ये 'दुल्हनिया' बनली राखी सावंत

'खतरा खतरा खतरा' शोमध्ये 'दुल्हनिया' बनली राखी सावंत

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे ती चर्चेत आहेत. राखीच्याबाबतीत प्रत्येक लहानसहान गोष्ट नेहमीच प्रकाशझोतात असते. राखीने इन्स्टाग्रामवर एकापाठोपाठ एक असे तीन फोटो शेअर केलेत. मात्र राखीचा नवरा कोण आहे हे माहिती नाही. ‘राखी कधी तरी गंभीर हो. कधी लग्न, कधी दीपक कलाल. ही ड्रामेबाजी आत्तातरी थांबव. याने तू स्वत:ची इमेज खराब करतेय,’ असे भन्नाट प्रतिक्रीया नेटीझन्स राखीच्या पोस्टवर शेअर करताना दिसतात. राखीचे खरचं लग्न झाले की तोही एक ड्रामाच आहे, हे कळायला मार्ग नाही. पण एक मात्र खरे की, या सगळ्यामुळे राखीला  जोरदार पब्लिसिटी मिळतेय.

तर राखीला तिच्या या सगळ्या ड्रामेबाजीचा चांगलाच फायदा होत असल्याचे दिसतंय. त्यामुळेच सध्या छोट्या पडद्यावर आता पुन्हा राखी झळकू लागली आहे. छोट्या पडद्यावरील 'खतरा खतरा खतरा' शोवर या ड्रामा क्विन राखी सावंत तिच्या उपस्थितीने सा-यांचे मनोरंजन करणार हे मात्र नक्की. यावेळी स्टेजवर तिची एंट्रीही खूप खास होती. एका नव्या नवरी सारखा तिने एका पालखीतून मंचावर एंट्री केली. चाहत्यांनी तिला प्रोत्साहन दिले आणि मंचावरील तिच्या नाट्यमय प्रवेशाचे स्वागत केले. तिची एंट्री होताच शोचे होस्ट भारती आणि हर्ष यांनी त्यात आणखीन थोडा ट्विस्ट आणण्याचे ठरविले आणि राखीला एका क्विर्की टास्कमध्ये घेतले.


  
या वेळी तिच्या सर्व प्रशंसकांनी कौतुकाने तिला राजकन्या बनविली होती. राखी सावंत एक मोठा मुकुट डोक्यावर घालून उंचावर बसली होती आणि ती सर्वात जास्त उंचावर असल्यामुळे रवि किशन आणि राणी चॅटर्जी आणि पार्थ समंथन आणि एरिका फर्नांडिस तिचा मुकुटला सुशोभित करण्यासाठी तिला फुले देण्यासाठी कपड्याच्या मार्गावरून पळत आहेत. यातच पुढे राखी सावंतने तिच्या आगामी 'छप्पन छुरी' या म्युझिक व्हिडिओवर डान्स सादर केला. 

Web Title: Rakhi Sawant ‘Bani Dulhaniya’ on COLORS' Khatra Khatra Khatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.