नागिन ३ मधील रजत टोकस आणि अंकित मोहनने हे काय केले?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 09:30 PM2018-11-12T21:30:00+5:302018-11-12T21:30:02+5:30

नागिन ३ या कार्यक्रमात रजत विक्रांतची तर अंकित युवीची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमातील या दोघांच्या भूमिका देखील प्रेक्षकांना भावत आहेत.

Rajat Tokas and Ankit Mohan becomes best friends on the sets of Colors’ Naagin 3? | नागिन ३ मधील रजत टोकस आणि अंकित मोहनने हे काय केले?

नागिन ३ मधील रजत टोकस आणि अंकित मोहनने हे काय केले?

googlenewsNext
ठळक मुद्देनागिन ३ या कार्यक्रमामुळे रजत आणि अंकित हे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आहेत.रजत आणि अंकितने देखील नुकतेच धोती आणि कुर्ता असे ट्रेडिशनल कपडे परिधान केले होते. एवढेच नव्हे तर या दोघांनी एकाच रंगाचे आणि अगदीच सेम धोती-कुर्ते घातली असल्याने ते अगदी सख्ख्या भावाप्रमाणे दिसत होते.

कोणत्याही कलाकारांमध्ये स्पर्धा ही असते. त्यामुळेच एका मालिकेत अथवा चित्रपटात एकत्र काम करत असलेले कलाकार एकमेकांचे चांगले फ्रेंड्स कधीच असून शकत नाही असे म्हटले जाते. पण ही गोष्ट चुकीचे असल्याचे नागिन ३ या मालिकेतील दोन कलाकारांनी नुकतेच सिद्ध केले आहे.

नागिन या मालिकेचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. सध्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा तिसरा सिझन पाहायला मिळत आहे. 'नागिन ३' मालिका सुपरनॅचरल पॉवरवर आधारित असून यात सुरभी ज्योती, पर्ल वी पुरी, रजत टोकस, रक्षंदा खान आणि अनिता हसनंदानी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेत काहीच आठवड्यांपूर्वी अंकित मोहनची एंट्री झाली आहे. अंकित या कार्यक्रमाच्या याआधीच्या सिझनमध्ये देखील झळकला होता. 

नागिन ३ या कार्यक्रमात रजत विक्रांतची तर अंकित युवीची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमातील या दोघांच्या भूमिका देखील प्रेक्षकांना भावत आहेत. या कार्यक्रमामुळे रजत आणि अंकित हे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आहेत. एवढेच नव्हे तर कार्यक्रमाच्या चित्रीकरणा दरम्यान देखील ते दोघे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या दिवसांत अनेक जण ट्रेडिशनल कपडे घालण्यास भर देतात. रजत आणि अंकितने देखील नुकतेच धोती आणि कुर्ता असे ट्रेडिशनल कपडे परिधान केले होते. एवढेच नव्हे तर या दोघांनी एकाच रंगाचे आणि अगदीच सेम धोती-कुर्ते घातली असल्याने ते अगदी सख्ख्या भावाप्रमाणे दिसत होते. त्या दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रजतनेच त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला आहे. 

'नागिन ३' मालिका लाँच झाल्यापासून आतापर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचे मन वेधून घेतले आहे आणि या मालिकेला प्रेक्षकांची चांगली दाद मिळते आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या कार्यक्रमात आता पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. 

Web Title: Rajat Tokas and Ankit Mohan becomes best friends on the sets of Colors’ Naagin 3?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.