'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिका बनली ग्लॅमरस, तिचा मेकओव्हर पाहून गॅरीसोबत सगळेच झाले अचंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 04:05 PM2019-09-30T16:05:38+5:302019-09-30T16:06:08+5:30

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील आता राधिकाचा मेकओव्हर झालेला पहायला मिळतो आहे.

Radhika becomes glamorous in 'Mazya Navaryachi Bayko', everyone is shocked to see her makeover | 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिका बनली ग्लॅमरस, तिचा मेकओव्हर पाहून गॅरीसोबत सगळेच झाले अचंबित

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिका बनली ग्लॅमरस, तिचा मेकओव्हर पाहून गॅरीसोबत सगळेच झाले अचंबित

googlenewsNext


'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील राधिका, गुरू, शनाया हे सगळेच प्रेक्षकांचे प्रचंड आवडते आहेत. या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच लागलेली असते. या मालिकेत आता राधिका मसाल्यांचे पुढे काय होणार या चिंतेत सगळे असताना आता राधिकाचा मेकओव्हर झालेला पहायला मिळतो आहे.

नुकताच झी मराठी वाहिनीच्या इंस्टाग्रामवर माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत राधिकाचा मेकओव्हर झालेला पहायला मिळतो आहे आणि पत्रकार परिषदेत पत्रकार यशाचं श्रेय कोणाला देणार असं राधिकाला विचारतात तेव्हा राधिका सौमित्रला असं सांगते आणि म्हणते की हाच माझा आधार. त्यावर गुरूनाथ व शनाया राधिकाचा लूक पाहून गोंधळून गेलेले पहायला मिळत आहेत.

राधिका आणि सौमित्रची वाढती जवळीक गुरूच्या आयुष्यात कोणतं नवीन वळण घेऊन येईल? हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळणार आहे.


आधीच्या भागात दाखवलं होतं की राधिकावर चिडून सौमित्र एका कॉफी शॉपमध्ये निघून जातो. राधिकादेखील त्याच्या मागोमाग जाऊन त्याचा गैरसमज दूर करते.

राधिका त्याला सांगते की, तिला तिच्या स्वकर्तृत्वावर या संकटातून बाहेर पडायचे आहे. स्वतःच्या हिमतीवर तिला तिची कंपनी पुन्हा परत मिळवायची आहे. हे सगळे ऐकल्यावर सौमित्रदेखील राधिकाला साथ द्यायचे ठरवतो. 

Web Title: Radhika becomes glamorous in 'Mazya Navaryachi Bayko', everyone is shocked to see her makeover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.