लग्नात मोना सिंगने केली या बॉलिवूड अभिनेत्रीची कॉपी, सोशल मीडियावर ठरली कॉपीकॅट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 10:55 AM2019-12-28T10:55:40+5:302019-12-28T11:00:32+5:30

अखेर वयाच्या 38 व्या वर्षी बोहल्यावर चढत तिने तिच्या आयुष्याची नवीन सुरूवात केली.

priyanka chopra wedding lehanga Copied by Mona Singh at the Her Wedding, See Pics | लग्नात मोना सिंगने केली या बॉलिवूड अभिनेत्रीची कॉपी, सोशल मीडियावर ठरली कॉपीकॅट

लग्नात मोना सिंगने केली या बॉलिवूड अभिनेत्रीची कॉपी, सोशल मीडियावर ठरली कॉपीकॅट

googlenewsNext

मोना सिंगने 27 डिसेंबर 2019 रोजी तिचा बॉयफ्रेंड श्यामशी लग्नगाठ बांधली. या सोहळ्यात तिचे जवळचे मित्र सहभागी झाले होते. यामध्ये गौरव गेरा, आशिष कपूर, मीता शर्मा आणि मिकी दुदाने यांचा समावेश आहे. मित्रमंडळींनी मोनाच्या लग्नापूर्वी होणा-या कार्यक्रमातही फुल ऑन धमाल केली होती. लग्नाचा पहिला फोटो समोर आला तेव्हा तिच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. या फोटोत नववधू मोना वधू पोशाखात कमालीची सुंदर दिसली. लाल कलरचा लेहंगा आणि त्यावर हेवी ज्वेलरी असा तिचा थाट  होता. 


एकीकडे तिच्या सुंदरतेचे गोडवे गात असताना दुसरीकडे मात्र तिचा लूक पाहून सा-यांना पिग्गी चॉप्स प्रियंका चोप्राचीच आठवण झाली. कारण, प्रियंकाने देखील लाल रंगाचा लेहंगा घातला होता. मोना कदाचित प्रियंकाची मोठी फॅन असावी म्हणूनच तिनेही सेम टू सेम प्रियंका प्रमाणेच लेहंगा बनवला होता. त्यामुळे मोनाने काही हटके आणि वेगळे न करता प्रियंकाचीच कॉपी केल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या काही वर्षापासून मोना कधी लग्न करणार यावरच तिला प्रश्न विचारले जायचे. अखेर वयाच्या 38 व्या वर्षी बोहल्यावर चढत तिने तिच्या आयुष्याची नवीन सुरूवात केली.

‘जस्सी जैसी कोई नही’ मालिकेतून  तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. अभिनेत्री मोना सिंग टेलिव्हिजन इंडस्ट्रीत चांगलीच लोकप्रिय आहे. मोनाने मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोजचे सूत्रसंचलन अशा दोन्ही गोष्टींचा समतोल साधत आजवरची वाटचाल केली आहे. याआधी मोना ‘बँड ऑफ बॉइज’ फेम अभिनेता करण ओबेरॉयला डेट करत होती. करणशी ब्रेकअप झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालशीही तिचं नाव जोडलं गेलं. गेल्या काही महिन्यांपासून मोनाने तिचा मोर्चा डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळवला आहे. 

Web Title: priyanka chopra wedding lehanga Copied by Mona Singh at the Her Wedding, See Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.