दुसऱ्यांदा घटस्फोट घेतेय ही टीव्ही अभिनेत्री, पतीवर लावले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 11:03 AM2020-02-11T11:03:55+5:302020-02-11T11:08:32+5:30

तिला या निर्णयाबद्दल कोणतीच खंत नाही आहे.

Priya bathija divorce kawaljeet second time take divorce | दुसऱ्यांदा घटस्फोट घेतेय ही टीव्ही अभिनेत्री, पतीवर लावले गंभीर आरोप

दुसऱ्यांदा घटस्फोट घेतेय ही टीव्ही अभिनेत्री, पतीवर लावले गंभीर आरोप

googlenewsNext

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बठीजाच्या घटस्फोटाची बातमीमुळे तिच्या फॅन्सचे मन तुटू शकते. प्रिया गेल्या अनेक दिवसांपासून पती कवलजीतपासून दूर राहते. राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार दोघांचा घटस्फोट जूनपर्यंत होऊ शकतो. 
रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान तिने सांगितले की, सगळ्या अडचणी लवकरच संपतील. मला आता फक्त माझ्या करिअरवर आणि कुटुंबीयांवर लक्षकेंद्रित करायचे आहे. तिला या निर्णयाबद्दल कोणतीच खंत नाही आहे.


 2017 मध्ये कवलजीत सलूजासोबत लग्न केले होते. कवलजीत हा डीजे असून त्या दोघांची एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून ओळख झाली होती. काहीच दिवसांत ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.  कवलजीतच्या आधी प्रियाचे लग्न अभिनेता जतिन शाहसोबत झाले होते. पण हे देखील तिचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. प्रियाने कवलजीत विरोधात घरगुती हिसेंची तक्रार नोंदवली होती.  


स्पॉटबॉयला याआधी दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, मी माझे संपूर्ण करियर सोडून त्याच्यासोबत रायपूरमध्ये स्थायिक झाले. मी, कवलजीत आणि त्याचे आई-वडील आम्ही सगळेच तिथे एकत्र राहात होतो. पण कवलजीतला मुंबईत यायचे होते आणि त्यामुळे आम्ही दोघे मुंबईला स्थायिक झालो. मुंबईत आल्यानंतर त्याचे करियर बनवण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली. पण त्याने केवळ मुंबईत येण्यासाठी माझा वापर केला होता. मी त्याचे मुंबई येण्याचे तिकीट होते हे मला त्याच्या वागणुकीतून कळायला लागले होते. मी घरगुती हिसेंची देखील शिकार झाले. अखेरीस कंटाळून मी ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर त्याने संगनमताने घटस्फोट घेण्यासाठी माझ्यावर दबाब टाकला. मी घटस्फोट घेऊन एका नव्या आयुष्याला सुरुवात करावी अशी माझ्या वडिलांची देखील इच्छा असल्याने मी यासाठी तयार झाले.


प्रियाने कमस से, बसेरा, बाबा ऐसा वर ढुंडो यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने नुकतीच डायन या मालिकेत साकारलेली आशाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

Web Title: Priya bathija divorce kawaljeet second time take divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.