‘राधाकृष्ण’ मालिकेतील ही अभिनेत्री घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 08:00 AM2019-03-18T08:00:00+5:302019-03-18T08:00:02+5:30

‘राधाकृष्ण’ या मालिकेने प्रेक्षकांना गेली अनेक महिने आपल्याशी बांधून ठेवले आहे. यातील केवळ नायक-नायिकेच्याच व्यक्तिरेखांना चाहते लाभले आहेत, असे नव्हे; तर अन्य व्यक्तिरेखांनाही स्वत:चा चाहतावर्ग लाभला आहे.

Preeti Verma’s character to end in RadhaKrishn | ‘राधाकृष्ण’ मालिकेतील ही अभिनेत्री घेणार प्रेक्षकांचा निरोप

‘राधाकृष्ण’ मालिकेतील ही अभिनेत्री घेणार प्रेक्षकांचा निरोप

googlenewsNext
ठळक मुद्देया मालिकेत अलीकडेच प्रवेश झालेल्या चंद्रवलीच्या व्यक्तिरेखेनेही आपल्या सुंदर व्यक्तिमत्त्वामुळे स्वत:चे असंख्य चाहते निर्माण केले होते. प्रीती वर्मा या अभिनेत्रीने ही व्यक्तिरेखा साकारली आहे. पण आता प्रीती वर्मा लवकरच या मालिकेचा निरोप घेणार आहे.

‘स्टार भारत’ वरील ‘राधाकृष्ण’ या मालिकेची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. तसेच या मालिकेतील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. पण आता या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेतील एक अभिनेत्री प्रेक्षकांचा आता निरोप घेणार आहे.

‘राधाकृष्ण’ या मालिकेने प्रेक्षकांना गेली अनेक महिने आपल्याशी बांधून ठेवले आहे. यातील केवळ नायक-नायिकेच्याच व्यक्तिरेखांना चाहते लाभले आहेत, असे नव्हे; तर अन्य व्यक्तिरेखांनाही स्वत:चा चाहतावर्ग लाभला आहे. या मालिकेत अलीकडेच प्रवेश झालेल्या चंद्रवलीच्या व्यक्तिरेखेनेही आपल्या सुंदर व्यक्तिमत्त्वामुळे स्वत:चे असंख्य चाहते निर्माण केले होते. प्रीती वर्मा या अभिनेत्रीने ही व्यक्तिरेखा साकारली आहे.

पण आता प्रीती वर्मा लवकरच या मालिकेचा निरोप घेईल, असे आम्हाला सूत्रांकडून समजले आहे. याचे कारण राधेच्या आयुष्यातील ईर्ष्येचा अध्याय लवकरच समाप्त होणार आहे. प्रीतीने चंद्रवलीची भूमिका सकस पद्धतीने साकारली होती, यात शंकाच नाही आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्ती केल्याने तिने आपला एक मोठा चाहतावर्गही निर्माण केला होता. या मालिकेतील प्रीतीची भूमिका ही लांबीने छोटी असली, तरी या भूमिकेमुळे आपल्याला एक संपन्न अनुभव मिळाला, असे तिने सांगितले. याविषयी प्रीती सांगते, “या विधायक आणि सुंदर मालिकेत भूमिका साकारण्याचा अनुभव फारच छान होता, असं मी म्हणेन. यातील सर्वच कलाकार आणि कर्मचारी मला आवडले आणि भविष्यातही मी त्यांच्या संपर्कात राहीन. ही मालिका माझ्यासाठी नेहमीच खास राहील.”

प्रीती वर्माने उडाण, लाडो यांसारख्या अनेक मालिकांमध्ये आजवर काम केले आहे. ‘राधाकृष्ण’ या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यामुळे तिचे फॅन्स तिला नक्कीच मिस करणार आहेत. आता ती पुढच्या कोणत्या मालिकेत झळकणार याची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहाणार यात काहीच शंका नाही.

‘राधाकृष्ण’ ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार रात्री 9.00 वाजता फक्त ‘स्टार भारत’वर पाहायला मिळत आहे. 

 

Web Title: Preeti Verma’s character to end in RadhaKrishn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.