या व्यक्तिचा फोटो पाहताच प्रशांत दामलेंच्या डोळ्यात तरळले अश्रू, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 07:15 AM2019-11-19T07:15:00+5:302019-11-19T07:15:00+5:30

प्रशांत दामले यांच्यासोबतच कविता लाडदेखील भावूक झाल्या.

Prashant damle become emotional on don special show | या व्यक्तिचा फोटो पाहताच प्रशांत दामलेंच्या डोळ्यात तरळले अश्रू, वाचा सविस्तर

या व्यक्तिचा फोटो पाहताच प्रशांत दामलेंच्या डोळ्यात तरळले अश्रू, वाचा सविस्तर

googlenewsNext

कलर्स मराठीवरील “दोन स्पेशल” कार्यक्रम महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मने जिंकत आहे. कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुण्यांना जितेंद्र जोशी त्यांच्या अनोख्या अंदाजमध्ये बोलत करतो. जितेंद्र जोशीने या पाहुण्या कलाकारांसोबत मारलेल्या दिलखुलास गप्पा रसिक प्रेक्षकांना आवडत आहेत... पाहुण्यांची विविध विषयावरील मते, त्यांच्या आयुष्यातील काही किस्से, आठवणी, अविस्मरणीय क्षण कार्यक्रमामध्ये बघायला मिळत आहेत. या आठवड्यात आपल्या सगळ्यांचे लाडके प्रशांत दामले आणि कविता लाड - मेढेकर येणार असून त्यांनी बरेच किस्से आणि आठवणी सांगितल्या आहेत... प्रशांत दामले मंचावर आले आणि गाणे होणार नाही असे तर अशक्यच. गप्पांची सुरुवात “मला सांगा सुख म्हणजे” या गाण्याने झाली... याचसोबत प्रेक्षकांना अनेक सुंदर गाणी ऐकायला मिळणार आहेत.  

जितुसोबत या कार्यक्रमामध्ये गप्पा चांगल्याच रंगल्या...  प्रशांत दामले त्यांच्या नावापुढे आणि का लावत नाहीत आणि त्यामागील त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तर, ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचा फोटो दाखवल्यावर प्रशांत दामले आणि कविता लाड खूपच भावुक झाले आणि त्यांनी काही आठवणींना उजाळा दिला... तसेच एका लग्नाची गोष्ट या नाटकाचे हजार प्रयोग झाले त्या दिवशी श्री. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काढलेला फोटो दाखवला तेव्हा सुधीर भट यांनी अमिताभ बच्चन यांना कोणता प्रश्न विचारला हे प्रशांत दामले यांनी सांगितले. त्यानंतर जितेंद्र जोशी यांनी प्रशांत दामले यांना विचारले प्रत्येक नाटकाचे किती प्रयोग झाले आहेत ? त्यावर त्यांचे उत्तर होते सगळी नाटकं मिळून एकूण बारा हजार दोनशे प्रयोग झाले आहेत.
 
 

Web Title: Prashant damle become emotional on don special show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.