'हा' लोकप्रिय अभिनेता स्वत:च्या वाढदिवशी देतो इतरांना गिफ्ट; कारण ऐकून वाटेल अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 07:49 PM2022-01-20T19:49:37+5:302022-01-20T19:50:33+5:30

Tv actor: अलिकडेच मालिकेच्या सेटवर या अभिनेत्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्याने इतरांना गिफ्ट्स दिले.

popular tv actor gives gifts to others on his birthday | 'हा' लोकप्रिय अभिनेता स्वत:च्या वाढदिवशी देतो इतरांना गिफ्ट; कारण ऐकून वाटेल अभिमान

'हा' लोकप्रिय अभिनेता स्वत:च्या वाढदिवशी देतो इतरांना गिफ्ट; कारण ऐकून वाटेल अभिमान

googlenewsNext

छोट्या पडद्यावर काही दिवसांपूर्वीच 'एक महानायक - डॉ. बी. आर. आम्बेडकर' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत असून मालिकेविषयी आणि त्यातील कलाकारांविषयी प्रत्येक माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. यामध्येच आता मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने त्याच्या जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हा अभिनेता त्याच्या वाढदिवशी इतरांकडून गिफ्ट घेण्यापेक्षा स्वत: दुसऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरवतो.

'एक महानायक - डॉ. बी. आर. आम्बेडकर'  या मालिकेत अभिनेता अथर्व कर्वे तरुण भीमरावांची भूमिका साकारत आहे. अलिकडेच मालिकेच्या सेटवर त्याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. परंतु, यावेळी त्याने सेटवरील इतरांनाच गिफ्ट देऊन हा दिवस साजरा केला.

''माझ्या वाढदिवशी सेटवर राहून चित्रीकरण पूर्ण करणे यातच मला खरा आनंद मिळतो. सेटवरील कलाकार,माझी टीम हे सगळे माझ्या कुटुंबाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तसंच इतरांना काही तरी दिल्यामुळे मला जास्त आनंद होतो. त्यामुळे माझ्या मनात इतरांविषयी असलेलं प्रेम, आदर आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी मी सगळ्यांसाठी भेटवस्तू आणल्या. ही माझी प्रेम व्यक्त करायची पद्धत आहे.  माझ्या पालकांकडून मी ही पद्धत शिकलो आहे. मी लहानपणापासून माझ्या वाढदिवशी मित्र परिवाराला काही ना काही रिटन गिफ्ट्स देत असतो, असं अथर्व म्हणाला.

पुढे तो म्हणतो, ''मला माझ्या वाढदिवसाच्‍या दिवशी नेहमीच माझ्या कुटुंबियांसोबत वेळ घालवायला आवडते. यंदा माझी आजी मुंबईला येऊ शकणार नाहीत, पण माझे आई-वडील माझ्यासोबत आहेत. 

दरम्यान, अर्थव सध्या या मालिकेत तरुण वयातील भीमराव यांची भूमिका साकारत आहे. अर्थवने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे सध्या तो लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असल्याचं म्हटलं जातं.
 

 

Web Title: popular tv actor gives gifts to others on his birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.