फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील जिजा अक्का आहेत या प्रसिद्ध अभिनेत्रींची सून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 06:00 AM2021-04-27T06:00:00+5:302021-04-27T06:00:02+5:30

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत जीजा अक्काच्या भूमिकेत आदिती मूलगुंड-देशपांडे या अभिनेत्रीला आपल्याला पाहायला मिळत आहे.

phulala sugandh maticha fame aditi mulgund deshpande is daughter in law of sulabha deshpande | फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील जिजा अक्का आहेत या प्रसिद्ध अभिनेत्रींची सून

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील जिजा अक्का आहेत या प्रसिद्ध अभिनेत्रींची सून

googlenewsNext
ठळक मुद्देया आदिती मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या सूनबाई आहेत. 

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेला खूपच कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेचा टीआरपी देखील खूप चांगला असून या मालिकेची कथा, कलाकारांचे अभिनय प्रेक्षकांना चांगलेच भावत आहेत.

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत जीजा अक्काच्या भूमिकेत आदिती मूलगुंड-देशपांडे या अभिनेत्रीला आपल्याला पाहायला मिळत आहे. या अभिनेत्रीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक त्यांचे फॅन्स नेहमीच करतात. तुम्हाला माहीत आहे का, या आदिती मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या सूनबाई आहेत. 

आदिती देशपांडे या सुलभा देशपांडे यांच्या सूनबाई आहेत. सुलभा देशपांडे यांनी मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. आदिती यांनी देखील मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील काम केले आहे. पेहरेदार पिया की या मालिकेत त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच नॉट ओन्ली मिसेस राऊत या प्रसिद्ध चित्रपटात त्या झळकल्या होत्या. 

मुलीच्या जन्माप्रमाणेच तिचं शिक्षण हा देखील नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं वर्चस्व जरी पाहायला मिळत असलं तरी लग्नानंतर तिने घरी धुणी भांडी करावीत, घरसंसारात स्वत:ला झोकून द्यावं अशी अपेक्षा सासरच्या मंडळींकडून केली जाते. मात्र एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. एकमेकांत मिसळून फुलण्यालाच संसार म्हणायचा असतो. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेची गोष्ट अशाच स्वप्नांना पूर्ण करणाऱ्या संसाराची आहे. या मालिकेत समृद्धी केळकर, हर्षद आतकरी, आदिती देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Web Title: phulala sugandh maticha fame aditi mulgund deshpande is daughter in law of sulabha deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.