कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता तिचे बाथरूममधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राखीने या फोटोसोबत जे कॅप्शन टाकलं आहे ते पाहून तिच्यासोबत कुणीतरी असल्याचं समजतं आहे.


राखीने बाथटबमधील फोटो शेअर करत लिहिलं की, Having fun with my love, getting crazy 


तिची ही पोस्ट पाहून ती तिच्या नवऱ्याबद्दल बोलत असल्याचं वाटतं आहे. याचा अर्थ राखी सावंतचा नवरा रितेश भारतात आला आहे. काही दिवसांपूर्वी राखीने सांगितलं होतं की लग्नानंतर तो परदेशात गेला आहे.


रितेश भारतात परतल्यामुळे राखी खूप खूश दिसते आहे. बाथटबमध्ये फोममध्ये वेगवेगळ्या पोझमध्ये राखीनं फोटो काढले आहेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 


कमेंट्स करणाऱ्यांमध्ये काही लोकांना अजूनही राखीचं लग्न झालेल्या वृत्तावर विश्वास नाही. एका युजरने म्हटलं की, हिचं लग्न झालेलं नाही. ही सर्वांना मुर्ख बनवते आहे. तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, कुठं आहे तुझं प्रेम? फोटोत तर दिसत नाही. बाथटब प्रेम आहे का?


राखी सावंतने नुकतंच एका एनआरआयसोबत गुपचुप लग्न केलं आणि त्यानंतर तिने सर्वांना सांगितलं. मात्र अद्याप राखीनं तिच्या नवऱ्यासोबत फोटो शेअर केलेला नाही.


Web Title: Photos of Rakhi Sawant in the bathtub are going viral on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.