पार्थ भालेराव करणार टेलिव्हिजनवर पदार्पण, पहिल्यांदाच हटके अंदाजात येणार रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 06:00 AM2020-10-21T06:00:00+5:302020-10-21T06:00:00+5:30

याविषयी पार्थ भालेरावने सांगितले की, 'भावड्याची चावडी' या कार्यक्रमात मी अगदी वेगळ्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. दुप्पट मजा, भरपूर मनोरंजन आणि आम्ही कलाकारांसोबत केलेला वेडेपणा या कार्यक्रमातून प्रेक्षक अनुभवू शकतील.

Parth Bhalerao Makes TV debut with comedy show Bhavdyachi Chavadi | पार्थ भालेराव करणार टेलिव्हिजनवर पदार्पण, पहिल्यांदाच हटके अंदाजात येणार रसिकांच्या भेटीला

पार्थ भालेराव करणार टेलिव्हिजनवर पदार्पण, पहिल्यांदाच हटके अंदाजात येणार रसिकांच्या भेटीला

googlenewsNext

लवकरच रसिकांचे तुफान मनोरंजन करण्यासाठी विनोदी कार्यक्रम रसिकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचं नाव आहे 'भावड्याची चावडी'. चावडीच्या माहोलला मराठी तरुणाई रिलेट करू शकते कारण त्यांच्या खऱ्या आयुष्यात देखील ते आपल्या मित्र मैत्रिणींना जवळच्या कट्ट्यावर भेटून वेळ घालवतात, हाच माहोल झी वाजवा वर भावड्याची चावडीमधून सादर होणार आहे. 

या कार्यक्रमाची कथा भावड्या या कुठल्याही सामान्य मुला सारख्या असलेल्या मुलाभोवती फिरते. हा एक तरुण मुलगा आहे ज्याला असं वाटत कि त्याच्याकडे खूप टॅलेंट आहे पण त्याला नक्की आयुष्यात पुढे काय करायचंय हे गुलदस्त्यातच आहे. याच गोष्टीवर चर्चा करत भावड्या आणि त्याचे अजून दोन मित्र त्याच्यासोबत चावडीवर वेळ घालवतात आणि त्यांच्या या चर्चेत ते अनेक कलाकारांना देखील आमंत्रित करून वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची मतं जाणून घेतात.

या कार्यक्रमातील भावड्या हा दुसरा तिसरा कोणी नसून 'भूतनाथ रिटर्न्स'मधला अक्रोड... म्हणजेच पुण्याचा मराठमोळा पार्थ भालेराव...अभिनेता पार्थ भालेराव आहे. या कार्यक्रमातून तो पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर आणि इतर अनेक कलाकार सिलेब्रिटी गेस्ट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येतील.

याविषयी पार्थ भालेरावने सांगितले की, 'भावड्याची चावडी' या कार्यक्रमात मी अगदी वेगळ्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. दुप्पट मजा, भरपूर मनोरंजन आणि आम्ही कलाकारांसोबत केलेला वेडेपणा या कार्यक्रमातून प्रेक्षक अनुभवू शकतील. या कार्यक्रमाच्या थीमसोबत सर्व प्रेक्षक रिलेट करू शकतील आणि म्हणूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवेल अशी मला खात्री आहे."प्रत्येक मराठी संगीतप्रेमी आणि मराठी तरुणाईसाठी झी वाजवा ही वाहिनी सिनेगीतांसोबत इतरही वेगवेगळ्या शैलींचे गाणे सादर करणार आहे.

"मी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी झी वाजवा या वाहिनीद्वारे पुन्हा एकदा हजर होतोय आणि यावेळी प्रथमच टेलिव्हिजन या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय यासाठी मी खूप उत्सुक आहे. 

Web Title: Parth Bhalerao Makes TV debut with comedy show Bhavdyachi Chavadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.