'जिजाजी छत पर है'मध्‍ये पंचम दिसणार स्‍त्री वेशात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 07:15 AM2019-02-08T07:15:00+5:302019-02-08T07:15:00+5:30

सोनी सब वाहिनीवरील 'जिजाजी छत पर है' मालिका दर आठवड्याला विनोदी एपिसोड्ससह प्रेक्षकांवर छाप पाडत आहे.

Pancham turns feminine on Sony SAB’s Jijaji Chhat Per Hain | 'जिजाजी छत पर है'मध्‍ये पंचम दिसणार स्‍त्री वेशात

'जिजाजी छत पर है'मध्‍ये पंचम दिसणार स्‍त्री वेशात

googlenewsNext

सोनी सब वाहिनीवरील 'जिजाजी छत पर है' मालिका दर आठवड्याला विनोदी एपिसोड्ससह प्रेक्षकांवर छाप पाडत आहे. विवाहाच्‍या धावपळीतून यशस्‍वीरित्‍या बाहेर पडलेले इलायची (हिबा नवाब) आणि पंचम (निखिल खुराणा) पुन्‍हा एकदा आनंदी झाले आहेत. पण त्‍यांच्‍या जीवनात लवकरच आणखी एक समस्‍या येणार आहे.
मुरारी व छोटे यांचा अपघात होतो आणि मुरारीला गंभीर दुखापत होते. त्‍याला बी पॉझिटीव्ह रक्‍ताची गरज असते. पंचमचा हाच रक्‍तगट असतो आणि तो रक्‍तदान करण्‍याचे ठरवतो. त्‍याला चुकीचे इंजेक्‍शन दिले जाते आणि त्‍याचा आवाज महिलेप्रमाणे होतो. त्‍याच्‍या वर्तनामध्‍ये फारच बदल होऊ लागतात. तो त्‍याची मिशी काढून टाकतो आणि लेहंगा परिधान करण्‍याचा प्रयत्‍न करतो. या वर्तनाबाबत भिती बाळगलेला पंचम याबाबत इलायचीला सांगतो. इलायची त्‍याला हॉस्पिटलला घेऊन जाते. पण तेथे परिस्थिती अधिकच बिघडते. पंचम अगदी महिलेप्रमाणे पोशाख परिधान करतो, महिलेप्रमाणे बोलायला लागतो आणि पिंकी दरोगाप्रती त्‍याचे प्रेम व्‍यक्‍त करतो.पंचम पुन्‍हा मूळ वेषात येईल का?
पंचमची भूमिका साकारणारा निखिल खुराणा म्‍हणाला, 'आगामी एपिसोड्स खूपच विनोदी आहे. पंचम पूर्णत: महिलेमध्‍ये बदलून जातो. हे वेषांतर माझ्यासाठी खूपच आव्‍हानात्‍मक होते. माझ्या अभिनयामध्‍ये महिलेचा हावभाव आणायचा होता. मी आशा करतो की, प्रेक्षकांना स्‍त्रीच्‍या रुपातील पंचमचा अभिनय आवडेल.'
'जिजाजी छत पर है' मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्‍त सोनी सबवर पाहायला मिळेल.
 

Web Title: Pancham turns feminine on Sony SAB’s Jijaji Chhat Per Hain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.