Omkar Gupta takes inspiration from Ranveer Singh to be an Ideal husband | आदर्श पती बनण्यासाठी ओंकारने घेतली या अभिनेत्याकडून प्रेरणा
आदर्श पती बनण्यासाठी ओंकारने घेतली या अभिनेत्याकडून प्रेरणा

‘प्यार के पापड’ मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेतील रंजक घडामोडींमुळे अल्पावधीतच मालिकेने रसिकांची पसंती मिळवली आहे. नुकतेच मालिकेत  ओंकारचा विवाह शिविकाशी पार पडल्याचे आपण पाहिले. हळु हळु दोघे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असले तरी त्या दोघांमध्ये  पाहिजे तसे स्ट्राँग बॉन्डींग निर्माण झालेले नाही. 


एक चांगला पती बनण्यासाठी  कुठेही कमी पडु नये यासाठी त्याने चक्क अभिनेता रणवीर सिंहचाच आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला आहे. चांगला पती होण्यासाठी आधी एक चांगला मित्र बनण्याचा त्याच्या प्रयत्नाला हळु हळु यश येत आहे.  शिविकाला त्याची गरज असताना ओंकार तिच्यासोबत होता. शिविकाचे वडील तिच्यावर प्रेम करीत नसले, तरी ती कसर ओंकारने तिच्यावर पूर्वीपेक्षाही अधिक प्रेम करून भरून काढली आहे.
आशय मिश्रा हा ओंकार गुप्ताची भूमिका साकारीत असून टीव्हीवर तो प्रथमच पतीच्या भूमिकेत झळकत आहे. सध्या ओंकार हा टीव्हीवरील सर्वांचा आदर्श आणि लाडका पती बनला आहे.  स्वंयंपाक करताना शिविकाने काही चुका केल्या, तेव्हा ओंकारनेच तिला सांभाळून घेतले होते. शिविकाच्या मनात तिच्या पतीबद्दल अढी होती. पण त्याने तिच्यावर केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे तिच्याही मनात आता त्याच्याबद्दल प्रेमाचे अंकुर फुलु लागले आहेत. त्यांच्यामधील प्रेम हळूहळू वाढत जाणार असून दोघांमध्येही ऑनस्क्रीन रोमान्स  रंगणार हे मात्र नक्की . 
 


Web Title: Omkar Gupta takes inspiration from Ranveer Singh to be an Ideal husband
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.