कलर्स वाहिनीवरील 'शक्ती एक अस्तित्व के एहसास की' मालिकेतील अभिनेत्री रूबीना दिलाइकने आपल्या भूमिकेतून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. या मालिकेची थीम वेगळी असल्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. रूबीना सोशल मीडियावर सक्रीय असून नेहमी ती इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. मात्र सध्या ती त्रस्त आहे. तिच्या हाताला दुखापत झाली असून यामुळे तिला आता सर्जरी करावी लागणार आहे.


काही महिन्यांपूर्वी रूबीनाला मालिकेच्या एका भागाचे चित्रीकरण करत असताना सेटवर दुखापत झाली होती. त्यानंतर रूबीनाने दुखापतीवर दुर्लक्ष केले. त्यामुळे रूबीनाला त्या दुखापतीचा त्रास होऊ लागला. आता ही दुखापत रूबीनासाठी त्रास बनली आहे. दुखापतीमुळे रूबीनाला शूट करताना बऱ्याच अडचणी येत आहेत. यामुळे तिला हाताची सर्जरी करावी लागणार आहे. 


रूबीना आता 'गुड्डन तुमसे ना हो पायेगा ' या मालिकेत दिसणार आहे. रूबीनाने २००८ मध्ये छोटी बहू- सिंदूर बिन सुहागन या मालिकेतून आपल्या करियरला सुरूवात केली. त्यानंतर सास बिना ससुराल, पूर्नविवाह आणि जिनी और जूजू यासारख्या या मालिकेत तिने काम केले. 


रूबीनाने गेल्यावर्षी बॉयफ्रेन्ड अभिनव शुक्लासोबत लग्न केले.

मात्र लग्नापूर्वी रूबीना सहकलाकार अविनाश सचदेवला देखील डेट करत होती. रूबीना आणि अविनाश यांच्या प्रेमाची सुरूवात छोटी बहू या मालिकेच्या सेटवर झाली होती. सुरूवातीला दोघे एकमेकांशी जास्त बोलत नव्हते. मात्र त्यानंतर आऊटडोर शूटिंगदरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. रूबीनाने अभिनव शुक्लाशी लग्न केले. हिमाचलमध्ये हे लग्न पार पडले. रूबीना आणि अभिनव या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


Web Title: OMG ...! rubina-dilaik-shakti-astitva-ke-ehsaas-ki-rubina-dilaik-surgery
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.