प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री दृष्टी धामी सध्या स्पेनमध्ये नवऱ्यासोबत हॉलिडे एन्जॉय करते आहे. दृष्टी हिने व्हॅकेशनमधील नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये दृष्टी व तिचा नवरा लिपलॉक करताना दिसत आहेत. दृष्टीने या फोटोला कॅप्शन दिलं की, लव, किसेस अँड समर टाईम मॅडनेस. 

दृष्टी सातत्याने स्पेन हॉलिडेचे फोटो शेअर करत आहेत. यापूर्वी दृष्टीने स्पेनमधील आयलंड फॉरमेंटेरा इथल्या ब्लॅक बिकनीमधील फोटो शेअर केले होते. ब्लॅक बिकनीतील फोटोत दृष्टी खूप बोल्ड दिसत होती. तिची टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करत दृष्टी चाहत्यांना फिटनेस चॅलेंज देत होती. 

व्हॅकेशनचा दृष्टी धामीने नवऱ्यासोबतचा सुंदर फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी बिच फेस. या फोटोत दोघेही परफेक्ट कपल वाटत आहेत.

दृष्टी आणि नीरजने २१ फेब्रुवारी, २०१५ साली लग्न केले होते. दृष्टीचा नवरा टेलिव्हिजन इंडस्ट्रीपासून दूर आहे. तरीदेखील तो दृष्टीमुळे नेहमी चर्चेत असतो. दृष्टी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कित्येक मालिकेत काम केलेलं आहे.

ती शेवटची सिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिनं नंदिनीची भूमिका साकारली होती. एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरवर आधारीत असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

दृष्टी या भूमिकेमुळे ट्रोलदेखील झाली होती. त्यानंतर तिने ही मालिका सोडली होती.

कॉन्ट्राव्हर्सियल कॉन्टेंटमुळे सिलसिला मालिका डि़जिटल माध्यमात शिफ्ट केली. पहिला सीझन संपल्यानंतर आता वूटवर सिलसिला सीझन २ प्रसारीत होत आहे.


Web Title: OMG ! Drashti dhami kisses husband neeraj during spain vacation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.