old lady scolding babdya of agga bai sasubai video viral | Viral Video : अग्गंबाई सासूबाई! बबड्यावर बरसल्या मालवणी आजीबाई!!

Viral Video : अग्गंबाई सासूबाई! बबड्यावर बरसल्या मालवणी आजीबाई!!

ठळक मुद्दे‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत अभिनेता आशुतोष पत्कीने सोहम अर्थात बबड्याची भूमिका साकारली आहे.

अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका आणि त्यावरचे भन्नाट मीम्स म्हणजे मनोरंजनाचा आणखी एक पर्याय. या मालिकेइतके मीम्स क्वचितच अन्य कुठल्या मालिकेवर बनले असतील.   बबड्यावरचे हसून लोटपोट करणारे मीम्स तर शेकडोंच्या संख्येने सापडतील. सध्या बबड्यावरचा एका मालवणी आजींचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत आजीबाई बबड्यांचा चांगलाच क्लास घेत आहेत. किती बोलता तो... बबड्या डँबिस असे काय काय ही आजी म्हणतेय. अगदी बबड्याला पाहिले की तळपायाची आग मस्तकात जावी, इतक्या आवेशात आजी व्हिडीओत बोलताहेत.

अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत अभिनेता आशुतोष पत्कीने सोहम अर्थात बबड्याची भूमिका साकारली आहे. लाडाने वाया गेलेला आणि आईची अजिबात काळजी नसलेला मुलगा अशा रूपातील भूमिका तो साकारत आहे. नकारात्मक छटा असलेल्या या भूमिकेने आशुतोषला अपार लोकप्रियता दिली. तेवढाच तिरस्कारही त्याच्या वाटयाला आला.

अलीकडे एका मुलाखतीत खुद्द आशुतोषने याबद्दल सांगितले होते. मालिकेतील बबड्या या व्यक्तिरेखेमुळे मला खूप लोक ओळखू लागलेत. पण मी ख-या आयुष्यातदेखील बबड्यासारखा बिघडलेला, आईची काळजी न घेणारा आहे, असा लोकांचा समज होतो. या मालिकेमुळे मला असे खूप विचित्र अनुभव आलेत. अगदी माझ्या शेजारी राहणाºया लोकांचे माझ्यासोबतचे वागणे बदलले. माझ्याशी पूर्वी बोलणारे लोक माझ्याकडे दुर्लक्ष करू लागलेत. अनेकदा मी माझ्या आईचाही राग ओढवून घेतो. असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. अर्थात सोहम ही माझ्या वाट्याला आलेली भूमिका आहे आणि ती प्रामाणिकपणे साकारण्याचा प्रयत्न करतो. माझ्यावर मीम्स मी कधीही मनावर घेतले नाही. उलट हे माझ्या भूमिकेचे, माझ्या अभिनयक्षमतेचे फलित आहे, असे मी मानतो असेही त्याने या मुलाखतीत सांगितले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: old lady scolding babdya of agga bai sasubai video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.