'बिग बॉस १५' COMING SOON, सलमान खान नाही तर 'हा' सेलिब्रेटी करणार होस्ट, जाणून घ्या कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 11:22 AM2021-07-24T11:22:40+5:302021-07-24T11:26:50+5:30

टीव्हीवरचा सगळ्यात वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस , लवकरच बिग बॉस शोचा १५ वा सिझन रसिकांच्या भेटीला येणार आहे. ...

Not Salman Khan Karan Johar To Host India’s Biggest Reality show Bigg Boss OTT on Voot | 'बिग बॉस १५' COMING SOON, सलमान खान नाही तर 'हा' सेलिब्रेटी करणार होस्ट, जाणून घ्या कोण आहे तो?

'बिग बॉस १५' COMING SOON, सलमान खान नाही तर 'हा' सेलिब्रेटी करणार होस्ट, जाणून घ्या कोण आहे तो?

googlenewsNext

टीव्हीवरचा सगळ्यात वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस, लवकरच बिग बॉस शोचा १५ वा सिझन रसिकांच्या भेटीला येणार आहे. या शोचे खास आकर्षण असते ते म्हणजे सलमान खान.सलमान खान आणि बिग बॉस शो हे जणून समीकरणच बनले आहे. टीव्हीवरच नाही तर इथर प्लॅटफॉर्मवरही हा शो समलानमुळे जास्त हिट ठरतो.   बिग बॉस १५ हा  OTT प्लॅटफॉर्मवर Voot वरही याचे प्रसारण होणार आहे. 

डिजिटल प्रसारण होणा-या शोमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. बॉलिवूडचा डॅडी करण जोहर यंदा VOOT वर होस्ट करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे सलमान टीव्हीवर होस्ट करताना दिसणार आहे. ईदच्या मुहर्तावर या शोचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. यात समलान खान दिसत आहे. त्यामुळे शोमध्ये बदल हा केवळ OTT प्लॅटफॉर्मसाठी करण्यात आला आहे. टीव्हीवर नव्या अंदाजात नव्या ढंगात, नव्या स्पर्धकांसह सलमान खान पुन्हा एकदा त्याच एनर्जीसह धुमाकुळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. 


'बिग बॉस' मधील प्रत्येक दिवस स्पर्धकांसाठी कठीण असतो. त्यात बिग बॉसच्या घरात काही मिळवायचं असेल तर स्पर्धकांना बराच घाम गाळावा लागतो. अगदी त्याच प्रमाणे करण जोहरालाही रसिकांची सलमानप्रमाणे पसंती मिळवायची असेल तर बराच घाम गाळावा लागणार असल्याचे दिसतंय. सुरुवातीपासून सलमाननेच हा शो होस्ट केला आहे. पूर्वीच्या भागांमध्येही काही एपिसोडसाठी वेगेवेगळ्या अभिनेत्यांनी सलमानची जागा घेत शोला होस्ट केले होते. पण त्या भागांना हवी तितकी पसंती मिळाली नव्हती. त्यामुळे करण जोहर  OTT प्लॅटफॉर्मवर आता हा शो होस्ट करणार म्हटल्यावर रसिकांची कितपत पसंती मिळते हे पाहणे रंजक असणार आहे.  

Web Title: Not Salman Khan Karan Johar To Host India’s Biggest Reality show Bigg Boss OTT on Voot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.