अग्गंबाई सासूबाई! निवेदिता सराफ दिसणार नव्या मालिकेत, नव्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 01:31 PM2022-03-29T13:31:52+5:302022-03-29T13:34:25+5:30

Nivedita Saraf : होय, नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झालाये. येत्या 4 एप्रिलपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

nivedita saraf playing mother in bhagya dile tu mala colors marathi new serial | अग्गंबाई सासूबाई! निवेदिता सराफ दिसणार नव्या मालिकेत, नव्या भूमिकेत

अग्गंबाई सासूबाई! निवेदिता सराफ दिसणार नव्या मालिकेत, नव्या भूमिकेत

googlenewsNext

‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका खूपच गाजली होती. इतकी की मालिकेचा दुसरा सीझन आला. ‘अग्गंबाई सूनबाई’ नावानं आलेला हा दुसरा सीझन देखील प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या. विशेषत: शुभ्रा अन् शुभ्राच्या सासूबाई आसावरी. होय, मालिकेत शुभ्राच्या सासूबाईची भूमिका अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf ) यांनी साकारली होती. आसावरीची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. आता याच आसावरी अर्थात निवेदिता सराफ आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. होय, नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झालाये. येत्या 4 एप्रिलपासून ही मालिका कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू होत आहे. मालिकेचं नाव आहे, ‘भाग्य दिले तू मला.’  (Bhagya Dile Tu Mala)

त्याच्यासाठी टेक्नॉसॅव्ही गॅजेट श्रेष्ठ आणि तिच्यासाठी चालती-बोलती माणसं... त्याला नाविण्याची कास तर तिला संस्कृती जपण्याचा ध्यास. येतेय हळूवार प्रेमाची गोड गोष्ट..., असं हा प्रोमो शेअर करताना लिहिलं आहे.
या मालिकेत ‘पाहिले न मी तुला’ फेम तन्वी मुंडले आणि ‘आई माझी काळुबाई’त झळकलेला विवेक सांगळे मुख्य भूमिकेत आहेत. यात निवेदिता विवेकच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

तन्वी मुंडलेने याआधी  पाहिले न मी तुला  या मालिकेत  मनूची भूमिका साकारली होती. विवेक सांगळेने देवयानी, लव्ह लग्न लोचा, आम्ही दोघी मालिकेत काम केले आहे.

भाग्य दिले तू मला  ही मालिका 4 एप्रिलपासून रात्री 9.30 वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे.   सध्या या वेळेत कलर्स मराठीवर ‘तुझ्या रुपाचं चांदनं...’ ही मालिका पाहायला मिळतेय. नवी मालिका येणार असल्याने ‘तुझ्या रुपाचं चांदनं...’ची वेळ बदलली जाईल असं दिसतंय.  निवेदिता, विवेक आणि तन्वीची ही मालिका प्रेक्षकांना किती आवडते, ते बघूच.

Web Title: nivedita saraf playing mother in bhagya dile tu mala colors marathi new serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.