​लागिरं झालं जी मधील अज्या म्हणजेच नितीश चव्हाणचा खऱ्या आयुष्यातील फोटो पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 06:29 AM2018-01-01T06:29:53+5:302018-01-01T11:59:53+5:30

लागिरं झालं जी ही मालिका सुरू होऊन अनेक महिने झाले आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

Nitish Chavan's real life photo shows you astonishing shock | ​लागिरं झालं जी मधील अज्या म्हणजेच नितीश चव्हाणचा खऱ्या आयुष्यातील फोटो पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

​लागिरं झालं जी मधील अज्या म्हणजेच नितीश चव्हाणचा खऱ्या आयुष्यातील फोटो पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

googlenewsNext
गिरं झालं जी ही मालिका सुरू होऊन अनेक महिने झाले आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील शीतली आणि अजिंक्य म्हणजेच अज्या हे दोघे तर प्रेक्षकांचे प्रचंड लाडके बनले आहेत. या मालिकेत प्रेक्षकांना अज्या आणि शीतलीची प्रेमकथा पाहायला मिळत आहे. मालिकेत आता अज्या आणि शीतलीची प्रेमकथा फुलू लागलीय. शीतल ही भूमिका अभिनेत्री शिवानी बोरकर साकारत आहे तर या मालिकेत अजिंक्यच्या भूमिकेत नितीश चव्हाण आहे. या मालिकेतील ही जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. 

nitish chavan
लागिरं झालं जी या मालिकेत अजिंक्य लष्करात दाखल होण्यासाठी मेहनत घेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्याखुऱ्या फौजीला जी मेहनत करावी लागते तशीच मेहनत तो आपल्या फिटनेसवर घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. कपाळावर चंद्रकोर, आकर्षक शरीरयष्टी यामुळे अजिंक्यचा ऑनस्क्रीन लूक रसिकांमध्ये विशेषतः तरुणींमध्ये हिट ठरत आहे. 
अंजिक्य त्याच्या मालिकेतील लूकपेक्षा खऱ्या आयुष्यात खूपच वेगळा दिसतो. त्याचा खऱ्या आयुष्यातील फोटो तुम्ही पाहिल्यास हा खऱंच तो अजिंक्य आहे का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल. या मालिकेत तो गावातील अतिशय साध्या मुलाची व्यक्तिरेखा साकारत आहे. पण खऱ्या आयुष्यात तो प्रचंड मॉर्डन आहे. कुण्या आघाडीच्या मॉडेलला लाजवेल असा त्याचा खऱ्या आयुष्यातील डॅशिंग, रॉकिंग लूक आहे. २७ वर्षीय नितीशचा जन्म साताऱ्यात झाला आहे. दापोलीत प्राथमिक शिक्षण, वाईमध्ये उच्चशिक्षण आणि पुढील शिक्षण त्याने पुण्यात पूर्ण केले. अभिनय आणि नृत्याची त्याला सुरुवातीपासूनच आवड होती. जेननेक्स्ट नावाची त्याने डान्स अकादमीही सुरू केली होती. अभिनयासोबतच नितीश डान्सिंगमुळेही लोकप्रिय आहे. 

lagir zal ji ajinkya

लागिरं झालं जी या मालिकेने छोट्या पडद्यावर एंट्री करताच अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली. पहिल्या एपिसोडपासून सुरू झालेला या मालिकेचा छोट्या पडद्यावरचा प्रवास आता बघता बघता १०० एपिसोडपर्यंत येऊन पोहचला आहे. 

Also Read : तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील गोदाक्कांचा म्हणजेच छाया सांगावकर यांचा खऱ्या आयुष्यातील फोटो पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का
 

Web Title: Nitish Chavan's real life photo shows you astonishing shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.