नीती टेलर करणार ह्या मालिकेत एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 06:30 AM2019-01-16T06:30:00+5:302019-01-16T06:30:00+5:30

नीती टेलर ही टीव्हीवरील अभिनेत्री लवकरच ‘स्टार प्लस’वरील ‘इश्कबाझ- प्यार की एक धिंचाक कहानी’ मालिकेत एका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Niti Taylor will be seen in this serial | नीती टेलर करणार ह्या मालिकेत एन्ट्री

नीती टेलर करणार ह्या मालिकेत एन्ट्री

googlenewsNext
ठळक मुद्देनीती टेलर दिसणार इश्कबाझ मालिकेत नीती दिसणार मन्नत कौर खुराणाच्या भूमिकेत


‘इश्कबाझ’च्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. आपला सहजसुंदर अभिनय आणि मोहकपणामुळे लक्षावधी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविलेली नीती टेलर ही टीव्हीवरील अभिनेत्री लवकरच ‘स्टार प्लस’वरील ‘इश्कबाझ- प्यार की एक धिंचाक कहानी’ मालिकेत एका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत ती मन्नत कौर खुराणा ही व्यक्तिरेखा साकारणार असून तिच्या आगमनानंतर कथानकाला नवे वळण मिळणार आहे.


‘इश्कबाझ’मध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यामुळे आनंदित झालेली नीती म्हणाली, इश्कबाझ- प्यार की एक धिंचाक कहानीसारख्या प्रचंड प्रेक्षकवर्ग लाभलेल्या आणि प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखणाऱ्या मालिकेत मला भूमिका रंगविण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूपच आनंदात आहे. छोट्या पडद्यावर मी आता एका वर्षानंतर दिसणार आहे. त्यामुळे माझे चाहते आणि प्रेक्षकांना मी पूर्वी कधी केलेली नाही, अशा एखाद्या भूमिकेत दिसायला हवे होते. मी नेहमीच काहीतरी नवी आणि वैशिष्ट्यपूर्ण भूमिका साकारण्याचा प्रयत्न करीत असते. या मालिकेतील मन्नत कौरची माझी व्यक्तिरेखाही अशीच नावीन्यपूर्ण आहे. या व्यक्तिरेखेत बरीच सुप्त क्षमता असून मी अशाच एखाद्या भूमिकेची प्रतीक्षा करीत होते. या भूमिकेत मी प्रेक्षकांना एका पूर्णपणे नव्या रूपात दिसणार आहे. नकुल मेहता आणि इतर गुणी कलाकारांबरोबर भूमिका रंगविण्यास मी आतुर झाले आहे.


आजवर अनेक मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारलेली नीती टेलर आता ‘स्टार प्लस’वरील ‘इश्कबाझ- प्यार की एक धिंचाक कहानी’ मालिकेत एका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तिचा प्रवेश झाल्यावर मालिकेच्या कथानकाला नवी कलाटणी मिळणार आहे.   

Web Title: Niti Taylor will be seen in this serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.