‘ये रिश्तें है प्यार के’मध्ये येणार ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 08:00 PM2019-05-25T20:00:00+5:302019-05-25T20:00:00+5:30

‘ये रिश्ते है प्यार के’ पहिल्याच दिवसांपासून रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेनं अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे.

New twists come Yeh Rishtey Hain Pyaar Ke serial | ‘ये रिश्तें है प्यार के’मध्ये येणार ट्विस्ट

‘ये रिश्तें है प्यार के’मध्ये येणार ट्विस्ट

googlenewsNext
ठळक मुद्देराजश्री तिच्या आयुष्यातील आधारस्तंभ आहे.

‘ये रिश्ते है प्यार के’ पहिल्याच दिवसांपासून रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेनं  अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या ह्या शो चे लक्ष मिष्ठीच्या मॅरिटल कोर्टशिपच्या मागणीवर आहे. मिष्ठीला रिहा शर्मा समर्थन देत तिची बडी मां राजश्री तिच्या आयुष्यातील आधारस्तंभ आहे. आपली व्यक्तिरेखा राजश्रीबद्दल आपले मत व्यक्त करताना लता सभरवाल यांचे ह्या संकल्पनेबद्दल विशेष मत आहे.

लता म्हणाल्या, “मॅरिटल कोर्टशिपची संकल्पना भारतीय समाजामध्ये तशी नवीन आहे आणि हल्लीच्या काळात ह्या संकल्पनेला बरीच लोकप्रियताही मिळाली आहे. लग्नाआधी मुलाने आणि मुलीने एकमेकांना समजून घेणे हे आजच्या काळातही तसे चालत नाहीच. आजच्या काळातील मिष्ठीसारख्या मिलेनियल्सना लग्नाचे वचन देण्याआधीच त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून काय हवे आहे ते पक्के ठाऊक असते आणि त्यांना आपल्या जोडीदाराला जाणून घेण्यासाठी वेळ हवा असतो. मला वाटतं की मोठ्‌यांनी आपल्या मुलांची लग्ने ठरवताना त्यांच्यावर विश्वास दाखवायला हवा. आपल्या मुलीनी आपल्या जोडीदाराला नीट समजून घ्यावे हे महत्त्वाचे आहे. ही संकल्पना आता आपल्या समाजात रूजायला हवी. राजश्री आपल्या प्रत्येक निर्णयाबद्दल जागरूक असते आणि अखेर मिष्ठीचे मत ती मानते आणि मग सर्वांनाच एकत्र बोलावून कुणाल रित्विक अरोरा आणि मिष्ठी यांना सर्वांसमोरच एकमेकांना समजून घेण्याची संधी देते. मला आनंद वाटतो की आम्ही कलाकार अशा प्रकारचे विकसनशील संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतो.” 

अनेक नाट्‌यमय वळणांसह हा शो जसजसा पुढे सरकेल तसतसे प्रेक्षकांना काही रोचक एपिसोड्‌स पाहायला मिळतील.

Web Title: New twists come Yeh Rishtey Hain Pyaar Ke serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.