'आई कुठे काय करते'मध्ये नवीन ट्विस्ट, अनघाच्या समोर येणार अभिचं धक्कादायक सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 02:11 PM2022-09-23T14:11:37+5:302022-09-23T14:12:05+5:30

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

New twist in 'Aai Kuthe Kay Karte', Abhi's shocking truth will be revealed to Anagha | 'आई कुठे काय करते'मध्ये नवीन ट्विस्ट, अनघाच्या समोर येणार अभिचं धक्कादायक सत्य

'आई कुठे काय करते'मध्ये नवीन ट्विस्ट, अनघाच्या समोर येणार अभिचं धक्कादायक सत्य

googlenewsNext

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे आशुतोष अरुंधतीला लग्नासाठी मागणी घालतो. तर दुसरीकडे संजना प्रेग्नेंट असल्याची शक्यता दाखवण्यात आली आहे. त्यात आता मालिकेत आणखी एक ट्विस्ट दाखवण्यात आला आहे. दरम्यान आता अनघाच्या समोर अभिचं धक्कादायक सत्य समोर येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून आई कुठे काय करते मालिकेत अनघा आणि अभि यांच्यात बिनसलेले पाहायला मिळत आहे. अनघाने काहीही केले तरी अभि तिच्याशी वाद घालायला सुरू करतो. सतत तिला बोलतो, टोमणे मारत असतो. अरुंधतीकडे अनघाचं जाणं आणि तिच्याशी सारखं संपर्कात राहणे त्याला खटकत राहतं. त्यामुळे प्रेग्नेंट असलेली अनघा वैतागली आहे. त्यात संजना अभिचे बाहेर काही चक्कर नाही ना, अशी शंका बोलून दाखवते.
दरम्यान मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात पाहायला मिळत आहे की, अभि घरी टिफिन विसरला म्हणून हाॅस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथे नर्स तिला सांगते, डाॅक्टर अभि हल्ली दररोज लवकर घरी जातात. ते ऐकून अनघाला धक्का बसतो. त्याआधीही अभि रात्री उशिरा घरी आल्यावर, तू कुठे होतास? असे तिने विचारल्यावर तो तिच्यावर खूप चिडतो. अनघा सगळ्यांना सांभाळून घेणारी दाखवलीय. आता ती अभिला जाब विचारणार की नाही, हे आगामी भागात कळेल. तसेच अभिचं खरंच बाहेर काही प्रकरण आहे का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.


याच प्रोमोत आणखी एक सीन आहे. ज्यात अनिश अरुंधतीला विचारतो तुम्ही आशुतोष चाचूबद्दल काय विचार केला आहे? अनिश म्हणतो, मला तुम्हा दोघांना आनंदी पाहायचे आहे आणि तुम्ही दोघे एकत्र असलात की खूश असता. त्यावर अरुंधती काय उत्तर देते, हेदेखील आगामी भागात समजेल.

Web Title: New twist in 'Aai Kuthe Kay Karte', Abhi's shocking truth will be revealed to Anagha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.