New track will come in tu ashi javali raha | 'तू अशी जवळी राहा'मध्ये सुरु होणार लव्हस्टोरी!

'तू अशी जवळी राहा'मध्ये सुरु होणार लव्हस्टोरी!

झी युवा वाहिनीवरील 'तू अशी जवळी राहा' या मालिकेतील राजवीर आणि मनवाला बऱ्याचदा भांडतानाच पाहिल्याचं तुम्हाला आठवत असेल. त्यांच्यातील या भांडणाचा शेवट बऱ्याचवेळा राजवीरच्या ठाम मतानेच होतो. राजवीरने त्याचे म्हणणे समोर ठेवायचे आणि बिचाऱ्या मनवाने ते गपचूप मान्य करायचे; हीच कहाणी पडद्यावर पाहायला मिळते. पण, पडद्यावर ही काहीशा दादागिरीची वागणूक खपवून घेणारी मनवा प्रत्यक्षात तशी नाही. अभिनेता सिद्धार्थ बोडके व अभिनेत्री तितिक्षा तावडे यांचे ऑफस्क्रिन नाते मात्र फारच निराळे आहे. सोशल मीडियाचा भरपूर वापर करणाऱ्या सिद्धार्थचा स्वभाव राजवीर सारखा मुळीच नाही. या दोघांची ऑफस्क्रीन मैत्री कशी आहे, हे इंस्टाग्रामच्या माध्यमातून नक्की पाहता येईल.

 
आपल्या अभिनय कौशल्याने सिद्धार्थने राजवीरची भूमिका उत्तमरित्या निभावली आहे. पण, त्याच्या इन्स्टाग्रामवर भेट दिलीत, तर खऱ्या आयुष्यातील सिद्धार्थ, राजवीरसारखा नाही, हे लगेचच तुमच्यालक्षात येईल. 

सतत पारंपरिक पेहरावात दिसणारी मनवा आणि सुटाबुटात टापटीप असलेला राजवीर, खऱ्या आयुष्यात मात्र अनेक तरुणांचे स्टाईल आयकॉनही ठरू शकतात. नुकताच सिद्धार्थने सोशल मीडियावर टाकलेला विडिओ हा याचा पुरावा आहे. आधुनिक कपडे, तरुणांना आवडेल अशी शैली असलेला एका रॅप गाण्याचा हा व्हिडिओ, तितिक्षा आणि सिद्धार्थ यांची मैत्री आणि त्यांचा 'कूललुक' सगळ्यांसमोर आणणारा आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: New track will come in tu ashi javali raha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.