ठळक मुद्देपुण्यातल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात आरोहचा जन्म झाला.  आरोह हा अभियंता आहे. पण आता ती ओळख कधीच मागे पडली आहे.

काल ‘बिग बॉस मराठी 2’ च्या वीकेण्डच्या डावात आणखी एक वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. ती कुणाची तर अभिनेता आरोह वेलणकर याची. बिग बॉसच्या घरात रंगलेल्या मर्डर मिस्त्री टास्कप्रमाणेच अभिजीतला नेहा, शिवानी आणि रुपाली यांचा सांकेतिक खून करण्याची सुपारी देण्यात आली. अभिजीतने नेहाचा सांकेतिक खून केल्यानंतर आरोहची बिग बॉसच्या घरात एंट्री झाली. आता आरोह कोणाच्या ग्रुपमध्ये जाणार की, वैयक्तिक खेळणार याची उत्सुकता तर आहेच. पण त्याआधी आरोहच्या पर्सनल लाईफबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात आरोहचा जन्म झाला.  आरोह हा अभियंता आहे. पण आता ती ओळख कधीच मागे पडली आहे. आता तो अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण या क्षेत्रात तो अपघानाने आला. मेकॅनिकल इंजीनिअरिंग करत असताना कल्चरल ग्रूपमध्ये ओपनिंग आहे असे त्याला कळले आणि तिथून महाविद्यालयीन अभिनयाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्याला नाटकांनी असे काही वेड लावले की, त्याने  स्वत:ला अभिनयाला वाहून घेतले.

 इंजीनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर कॅम्पसमधून मिळालेल्या उत्तम पॅकेजच्या नोकरीकडे पाठ फिरवत त्याने केवळ नाटकात भाग घेण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. एमई करत असताना वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला. २०१२मध्ये ‘रेगे’ या चित्रपटात काम करण्याची संधी त्याला मिळाली आणि  या चित्रपटामुळे  आरोह वेलणकर  हे नाव सर्वपरिचित झाले. त्यानंतर तो ‘घंटा’ या सिनेमात दिसला. आरोह सध्या रंगभूमीवर ‘व्हाय सो गंभीर’ या नाटकातल्या मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे आणि आता ‘बिग बॉस मराठी’ हा शो तो गाजवणार आहे.

अभिनेता आरोह वेलणकर हा विवाहित आहे. आरोहने मारवाडी गर्ल अंकिता शिंघवीसोबत विवाह केला आहे. अंकिता आणि आरोहची भेट कॉलेज कॅम्पसमध्ये झाली होती. अंकिता तिच्या मैत्रिणींसह कॉलेजच्या कॉरीडोरमध्ये उभी होती त्यावेळी आरोह आणि त्याच्या मित्रांनी अंकिता आणि तिच्या मैत्रिणींना त्यांचा थिएटर ग्रुप जॉईन करण्यासाठी अ‍ॅप्रोच केला.

आरोहला त्याच्या थिएटर ग्रुपसाठी कोरिओग्राफर आणि डान्सरची गरज होती. अंकिताच्या मैत्रिणींनी आणि अंकिताने यासाठी होकार भरला आणि त्यानंतर त्यांचे वरचेवर भेटणे बोलणे सुरु झाले. हे वरचेवर भेटणे-बोलणे कधी मुव्ही डेट आणि कॉफीडेटमध्ये बदलले ते कळालेच नाही आणि त्यांचे अफेअर सुरु झाले.

 


Web Title: new member in colors bigg boss marathi 2 aroh velankar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.