'तारक मेहता'मध्ये येण्यापूर्वी अंजली भाभी पहिले करायची 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 02:05 PM2021-09-19T14:05:36+5:302021-09-19T14:06:26+5:30

Neha mehta: अभिनेत्री नेहा मेहताने अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर अनेकांची मनं जिंकली आहे.

neha mehta known facts about anjali bhabhi of tmkoc actress | 'तारक मेहता'मध्ये येण्यापूर्वी अंजली भाभी पहिले करायची 'हे' काम

'तारक मेहता'मध्ये येण्यापूर्वी अंजली भाभी पहिले करायची 'हे' काम

googlenewsNext
ठळक मुद्देअंजली 'तारक मेहता का'पूर्वी कोणतं काम करायची माहितीये का?

छोट्या पडद्यावरील तुफान लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे जेठालाल, दया भाभी, भिडे, अय्यर, तारक मेहता आणि अंजली भाभी या काही मोजक्या कलाकारांचा एक स्वतंत्र असा चाहता वर्ग निर्माण झालेला आहे. त्यातच अंजली भाभी अर्थात अभिनेत्री नेहा मेहताने तिच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर अनेकांची मनं जिंकली आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अंजली 'तारक मेहता का..'पूर्वी कोणतं काम करायची माहितीये का? अनेकांना यामागचं उत्तर माहित नसेल. त्यामुळेच तारक मेहतापूर्वी नेहा मेहता कोणतं काम करायची ते जाणून घेऊयात.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत जवळपास १२ वर्ष काम केल्यानंतर नेहा मेहताने या मालिकेचा निरोप घेतला. परंतु, ही मालिका सोडल्यानंतरही तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये जरासाही फरक पडलेला नाही. 
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करण्यापूर्वी अंजली 'डॉलर बहू' या मालिकेत काम करत होती. २००१ मध्ये या मालिकेच्या माध्यमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर २००८ मध्ये तिला 'तारक मेहता..'मध्ये काम करण्याची संधी मिळाली.

लकी अलीच्या 'ओ सनम'वर स्वीटूचा मनमोहक डान्स; एक्स्प्रेशनमुळे जिंकली नेटकऱ्यांची मनं

दरम्यान, तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतून आपली ओळख निर्माण करणाऱ्या नेहा मेहताचा जन्म ९ जून, १९७८ साली गुजरातमधील भावनगरमध्ये झाला. नेहाने आपल्या करिअरची सुरूवात २००१ साली डॉलर बहू मालिकेतून केली होती. तसंच नेहाचे वडील दिग्गज लेखक असल्याचंही सांगण्यात येत.
 

Web Title: neha mehta known facts about anjali bhabhi of tmkoc actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.