Neha Kakkar speaks for the first time on marriage and first meeting with Rohan Preet | रोहन प्रीतसोबत पहिल्या भेटीबाबत केला नेहाने खुलासा, 'मी जेवढ्या मुलांना भेटले, रोहू सर्वात जास्त क्यूट आहे'

रोहन प्रीतसोबत पहिल्या भेटीबाबत केला नेहाने खुलासा, 'मी जेवढ्या मुलांना भेटले, रोहू सर्वात जास्त क्यूट आहे'

नुकतंच बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्करचं लग्न झालं. नेहाच्या लग्नाची चर्चा सोशल मीडिया आणि मीडियात चांगलीच रंगली. लग्नापासून ते हनीमूनपर्यंतचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रोहन प्रीत आणि नेहाची जोडी तिच्या फॅन्सना चांगलीच आवडली. नेहा आता लवकरच इंडियन आयडॉलच्या नव्या सीझनमध्ये जज म्हणून दिसणार आहे. अशात अनेकांना प्रश्न पडला आहे की, तिची आणि रोहन प्रीतची भेट कशी झाली आणि त्यांची लव्हस्टोरी कशी सुरू झाली?

नेहाने नुकताच याबाबत खुलासा केला. नेहाने सांगितले की, ती रोहन प्रीतला 'नेहू दा व्याह'च्या शूटवर पहिल्यांदा भेटली होती. त्याच्याबाबत माझं पहिलं इम्प्रेशन हे होतं की, तो सेटवर सर्वच लोकांसोबत थोडा जास्तच चांगला होता. आपण हे अमान्य करू शकत नाही की, तो फार जास्त क्यूट आहे. 

मी आतापर्यंत जेवढ्या मुलांना भेटले त्यात तो सर्वात जास्त क्यूट आहे. आमच्यात आकर्षण फार मजबूत होतं. तेव्हा मला असं जाणवलं की, तो माझ्यासाठी बनला आहे. मला हे कळालंच नाही की, केव्हा त्याने मला प्रपोज केलं आणि कधी आमचं लग्न झालं. वेळ अशीच निघून गेली.

नेहा म्हणाली की, तिने सध्या ब्रेक घेतला आहे. सध्या ती आराम करत आहे. पण मला विश्वास आहे की, मी माझ्या वैवाहिक जीवनात आणि कामात एक चांगलं संतुलन ठेवू शकणार आहे. कारण जीवन हे मल्टीटास्किंगबाबत आहे.

नुकताच नेहाच्या लग्नाला एक महिना पूर्ण झालाय. याबाबतचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. रोहनप्रीतने या निमित्ताने नेहासाठी मेसेज लिहिला की, हॅलो माझी सुंदर गुडिया जीवन तुझ्यासोबत फार सुंदर आहे. आपली फर्स्ट मंथ एनिव्हर्सरी आहे. आणि मला विश्वास बसत नाहीये की, तू माझी आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Neha Kakkar speaks for the first time on marriage and first meeting with Rohan Preet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.