ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी आदित्य व नेहाचे गोव्यातील बीचवरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आजच्या तरूणाईला आपल्या गाण्याने वेड लावणारी गायिका नेहा कक्कड आणि सिंगर आदित्य नारायण सध्या जाम चर्चेत आहेत. नेहा कक्कड येत्या १४ फेब्रुवारीला आदित्य नारायण सोबत विवाह बंधनात अडकणार असल्याचे मानले जातेय. आदित्य तर नेहावर लट्टू आहेच. पण नेहाने मात्र अद्यापही काहीही उघड केलेले नाही. पण आता नेहाने एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने लाल चूडा घातलेला दिसतोय आणि बॅकग्राऊंडमध्ये  ‘याद पिया की आने लगी’ हे गाणं सुुरू आहे.

तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते थोडे कन्फ्युज झाले आहेत. नेहाने आदित्यला लग्नासाठी होकार दिला की काय? ही लग्नाची तयारी सुरु झाली की काय? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

‘इंडियन आयडल 11’ हा रियालिटी शो सुरू असताना संपूर्ण नारायण परिवाराने एकत्रित येऊन नेहाला लग्नाची मागणी घातली होती. यावेळी आदित्यचे वडील सुप्रसिद्ध गायक उदित नारायण आणि दिपा नारायण यांनी नेहाला आपली सून होण्याची इच्छा व्यक्त केली होती.  विशेष म्हणजे 14 फेबु्रवारीला नेहा व आदित्यचे लग्न होणार, असेही नॅशनल टीव्हीवर जाहिर झाले होते. आता हे लग्न खरच होणार की नाही, हे 14 तारखेलाच कळणार. तूर्तास मात्र नेहाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

 काही दिवसांपूर्वी आदित्य व नेहाचे गोव्यातील बीचवरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे हे दोघं गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार का अशी चर्चा सुरू होती. पण हे फोटो डेस्टिनेशन वेडिंगचे नाही तर नेहा आणि आदित्यच्या नव्या गाण्याच्या शूटचे फोटो होते.

गोवा बीचवर हे शूटींग झाले होते. उद्या 10 फेब्रुवारीला त्यांचे हे गाणे रिलीज होत आहे. हे सिंगल नेहाचा भाऊ टोनी कक्करने कंपोज केले आहे.


 

Web Title: neha kakkar aditya naraya marriage neha appears in red bangle watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.