Nach Baliye 9: Raveena Tandon has a face-off with Maniesh Paul on sets | अन् रवीना टंडन मनीष पॉलवर भडकली; ‘नच बलिए 9’च्या सेटवर हाय-व्होल्टेज ड्रामा 
अन् रवीना टंडन मनीष पॉलवर भडकली; ‘नच बलिए 9’च्या सेटवर हाय-व्होल्टेज ड्रामा 

ठळक मुद्देयापूर्वी शोचा स्पर्धक शांतनूसोबत जजेसचा वाद झाला होता.

‘नच बलिए 9’मधील हाय-व्होल्टेज ड्रामा थांबायची चिन्हे नाहीत. होय, यंदाचे या शोचे सीझन डान्सपेक्षा वादांमुळे चर्चेत आहे. शोचे जजेस आणि स्पर्धकांतील वाद चव्हाट्यावर आले असताना आता ‘नच बलिए 9’ची जज रवीना टंडन आणि होस्ट मनीष पॉल यांच्यातील भांडणाची चर्चा आहे. होय, या भांडणामुळे शोचे शूटींग सुमारे तासभर थांबवावे लागले.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शोचा होस्ट मनीष पॉल याने शूटदरम्यान ईअरफोन घातले होते. जेणेकरून मेकर्सकडून येणाºया सूचना तो ऐकू शकेल. मेकर्सनी मनीषला काही निर्देश दिलेत. ते ऐकून मनीषच्या चेह-यावर काहीसे विचित्र भाव उमटले. यावेळी रवीना टंडन अगदी मनीषच्या समोर होती. मनीषने आपल्याला पाहून तोंड वेडेवाकडे केले, असे रवीनाला वाटले आणि तिचा पारा चढला. ती प्रचंड संतापली आणि शूट सोडून तिने स्वत:ला व्हॅनिटी व्हॅनमध्ये कोंडून घेतले. यामुळे सुमारे तासभर शूटींगचा खोळंबा झाला. प्रॉडक्शन टीमने कशीबशी रवीनाची समजूत काढली आणि तेव्हा कुठे ती सेटवर परतली.

यापूर्वी शोचा स्पर्धक शांतनूसोबत जजेसचा वाद झाला होता. जजेसकडून मिळणा-या गुणांवर शांतनू समाधानी नव्हता. जजेस भेदभाव करतात, असा शांतनूचा आरोप होता. रवीनाला ही गोष्ट कळली तेव्हा तिने शांतनूचा क्लास घेतला होता. यावरून रवीना व शांतनू यांच्या मोठा वाद झाला होता.

त्यापूर्वी वाइर्ल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून शोमध्ये वापसी करणा-या उर्वशी ढोलकिया हिच्यावर रवीना बरसली होती. उर्वशी तिच्या एलिमिनेशनमुळे खूश नव्हती. एलिमिनेशन झाल्यामुळे संतापलेल्या उर्वशीने शो आणि जजेसवर संताप व्यक्त केला होता. वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे उर्वशी शोमध्ये परतली तेव्हा रवीनाने याच मुद्यावरून उर्वशीला फैलावर घेतले होते. तुम्हाला याठिकाणी संधी मिळाली आहे. बाहेर जाऊन उलटसुलट बोलण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही, असे रवीना उर्वशीला म्हणाली होती.

Web Title: Nach Baliye 9: Raveena Tandon has a face-off with Maniesh Paul on sets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.