Must See: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम वर्षा म्हणजेच पूजा जोशीने केले मॅटर्निटी फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 12:23 PM2017-09-25T12:23:24+5:302017-09-25T17:53:24+5:30

प्रिवेडींगअल्बम फोटोशूटप्रमाणे आता  मॅटर्निटी फोटोशूटही तुफान हिट ठरतोय.खास करून बॉलिवूड अभिनेत्रींनी सुरू केलेला हा ट्रेंड आता टीव्ही अभिनेत्रींमध्येही पाहायला ...

Must See: 'What is this relation?', 'Fem Varsha', 'Pyaar Joshi', 'Matniti Photoshoot' | Must See: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम वर्षा म्हणजेच पूजा जोशीने केले मॅटर्निटी फोटोशूट

Must See: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम वर्षा म्हणजेच पूजा जोशीने केले मॅटर्निटी फोटोशूट

googlenewsNext
रिवेडींगअल्बम फोटोशूटप्रमाणे आता  मॅटर्निटी फोटोशूटही तुफान हिट ठरतोय.खास करून बॉलिवूड अभिनेत्रींनी सुरू केलेला हा ट्रेंड आता टीव्ही अभिनेत्रींमध्येही पाहायला मिळतो आहे. गेल्या काही महिन्यांत प्रेग्नंट असलेल्या टीव्ही अभिनेत्रींनी मॅटर्निटी फोटोशूट करत सोशल मीडियावर काही निवडक फोटो शेअर केले आहेत.एरव्ही लग्न केल्याचीही बातमी बाहेर न पडू देणा-या या अभिनेत्री आज  उघडपणे आपले बेबी बम्पचं दर्शन घडवत असल्याचं गेल्या काही वर्षात पाहायला मिळालं आहे.आपल्या ग्लॅमरस अदांप्रमाणेच बेबी बम्प दाखवताना या अभिनेत्रींनी जणू वेगळंच ग्लॅमर मिळवून दिलं आहे.खासगी गोष्टी पूर्वी फॅन्स आणि विशेषतः माध्यमांपासून लपवून ठेवत असत. त्यातच आपल्या प्रेगनन्सीबाबतची बाब तर माध्यमांमध्ये लीक होणार नाही याची अभिनेत्री काळजी घेताना पाहायला मिळायच्या. हे गुपित कसं राहिल याची खबरदारी घेतली जात असे. मात्र आता काळ बदलला आहे आणि काळानुरुप आजच्या अभिनेत्रींच्या विचारांमध्येही बदल झाला आहे. त्यामुळेच की काय कोणतीही गोष्ट लपवून ठेवणं यावर त्यांचा विश्वास नाही. प्रत्येक गोष्ट माध्यमांमध्ये येऊन चर्चेत कसं राहता येईल असा खटाटोप अभिनेत्रींचा असतो. त्यामुळेच की काय प्रेगनन्सीची गोष्टही त्या लपवून ठेवत नाहीत. उघडपणे या अभिनेत्री आपले बेबी बम्पचं दर्शन घडवत असल्याचं गेल्या काही वर्षात पाहायला मिळालं आहे.आपल्या ग्लॅमरस अदांप्रमाणेच बेबी बम्प दाखवताना या अभिनेत्रींनी जणू वेगळंच ग्लॅमर मिळवून दिलं आहे.दिया और बाती हम मालिकेतील दिपिका सिंग,'कसम'मालिकेतील रोशनी चोप्रा,'बडे अच्छे लगते है', कबूल है 'कुमकुम: प्यारा सा बंधन', 'तुझ संग प्रीत लगाई सजना' आणि 'हीरो भक्ति की शक्ति है' यांसारख्या मालिकेत झळकलेली   चाहत खन्ना अशा अनेक अभिनेत्री मॅटर्निटी फोटोशूट करत बेबी बम्प फ्लाँट करताना पाहायला मिळाल्या. आता याच यादीत आणखीन एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' ची वर्षा म्हणजेच पूजा जोशी प्रेग्नेंट आहे.नुकतेच पूजाने मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधले काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या फोटोंना तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे.हे पूजाचे पहिलेच बाळ असणार आहे. पूजाने 'धरती की वीर योद्धा: पृथ्वीराज चौहान'मधून टीव्हीवर डेब्यू केला होता. पूजाने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतही काम केले आहे.

Also Read: बेबी बम्पचा फोटो शेअर करून सेलिना जेटलीने ओढवून घेतला वाद! ट्रोलर्सचा हल्लाबोल!!

Web Title: Must See: 'What is this relation?', 'Fem Varsha', 'Pyaar Joshi', 'Matniti Photoshoot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.