The Murder Mystery Is Going To Unveil On BIG BOSS For The First Time | बिग बॉस मराठी-2- पहिल्यांदाच पार पडणार असे कार्य, जाणून तुम्हालाही बसेल मोठा धक्का !
बिग बॉस मराठी-2- पहिल्यांदाच पार पडणार असे कार्य, जाणून तुम्हालाही बसेल मोठा धक्का !

बिग बॉस शोमुळे कलाकारांच्या खासगी गोष्टीही त्यांच्या चाहत्यापर्यंत पोहचतात. त्यामुळे बिग बॉस शो मोठ्या प्रमाणात बघितला जातो. तसेच घरात दिवसें दिवस होणार घडामोडींमुळे हा शो प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. दरवेळी वेगवेगळ्या साप्ताहिक कार्य आपण या घरात पाहतो. आता पहिल्यांदाच एक कार्य तुम्हाला या घरात पाहायला मिळणार आहे. आजपर्यंत हिंदी बिग बॉसमध्येही हे कार्य घडले नाही ते आता पहिल्यांदाच मराठी बिग बॉसच्या घरात घडणार आहे. 

नुकताच घरामध्ये कॅप्टनसी टास्क रंगला आणि त्यामध्ये रुपालीने बाजी मारली आणि घराची नवी कॅप्टन बनली. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आगळावेगळा टास्क रंगणार आहे. बिग बॉसच्या घरावर एक मोठे संकट आले असून या संकटातून बाहेर पडण्यासाठी बिग बॉस सदस्यांवर मर्डर मिस्ट्री हे साप्ताहिक कार्य सोपवणार आहेत. 

या कार्यानुसार बिग बॉस मराठीच्या घरात सांकेतिक खून होणार आहे. प्रत्येक बजरला खून झालेला सदस्य कॅप्टनपदाच्या शर्यतीमधून बाहेर पडेल. शेवटच्या बजरनंतर खुनापासून वाचलेल्या सदस्याला कॅप्टन पदाच्या शर्यतीत फायदा होईल असे बिग बॉसनी जाहीर केले. बिग बॉसने  नेहा आणि शिवला या कार्यामध्ये काय व्हायला आवडेल खुनी कि सामान्य नागरिक असे विचारले यावर नेहा आणि शिवने खुनी व्हायला आवडले असे उत्तर दिले. येणा-या भागात हे कार्य कसे पार पडणार हे पाहणे नक्कीच रंजक असणार आहे.  


Web Title: The Murder Mystery Is Going To Unveil On BIG BOSS For The First Time
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.