सारेगमप लिटिल चॅम्प्स ट्रोल केल्यावर मृण्मयी देशपांडे म्हणते 'आमच्या शोमुळे ट्रोलर्सचा धंदा चाललाय'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 02:38 PM2021-07-21T14:38:04+5:302021-07-21T14:38:44+5:30

मीम्स व्हायरल करत कार्यक्रमाची खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळतं. पंचरत्न म्हणजेच आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत,मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड हे स्पर्धकांना जज करत असल्यामुळे आधी त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.

Mrunmayee Deshpande Comments on trollers, says trollers business runs on our show | सारेगमप लिटिल चॅम्प्स ट्रोल केल्यावर मृण्मयी देशपांडे म्हणते 'आमच्या शोमुळे ट्रोलर्सचा धंदा चाललाय'

सारेगमप लिटिल चॅम्प्स ट्रोल केल्यावर मृण्मयी देशपांडे म्हणते 'आमच्या शोमुळे ट्रोलर्सचा धंदा चाललाय'

googlenewsNext

छोट्या पडद्यावर नुकताच रसिकांच्या भेटीस आलेल्या सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाला रसिकांनी सुरुवाती पासूनच पसंती दिली आहे. १४ अफलातून लिटिल चॅम्प्स आणि त्यांचे भन्नाट सादरीकरण अगदी पहिल्या भागापासूनच रसिकांना थक्क करत आले आहेत. या प्रतिभावान लिटिल चॅम्प्सना मार्गदर्शन करणारे पंचरत्न यांच्यासाठी देखील या लिटिल चॅम्प्सना जज करणं कठीण जातंय यात शंका नाही. एकीकडे रसिकांची या कार्यक्रमाला पसंती मिळते तर दुसरीकडे सोशल मीडियावर नेटीझन्स मात्र कार्यक्रमाची खिल्ली उडवताना दिसतात. 

मीम्स व्हायरल करत कार्यक्रमाची खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळतं. पंचरत्न म्हणजेच आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत,मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड हे स्पर्धकांना जज करत असल्यामुळे आधी त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.आता सुत्रसंचालन करणारी मृण्मयी देशपांडेवरही नेटीझन्सने निशाणा साधला आहे. तिच्यावरही खास मीम्स बनवत ते व्हायरल केले जात आहेत. हे पाहून मृण्यमीने यावर आपले मत मांडले आहे.

काही दिवसांपूर्वी मृण्मयीनं लोकमतला दिलेल्या मुलाखतीत 'आमच्या शोमुळे ट्रोलर्सचा धंदा चाललाय', असं म्हणत ट्रोल करणा-यांना प्रत्युत्तर दिले होते. यानंतर ट्रोलरर्सनी मृण्मयीवर मीम्स बनवून व्हायरल केले. हे मीम्स सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनीही मृण्मयीला सपोर्ट करत ट्रोलर्सना सुनावत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वीच एका युजरने कमेंट करत म्हटले होते की, समोर असलेले जज आणि अँकर खूपच आरडा ओरडा करतात. यावर शांत न बसता मृण्मयीनेही ट्रोलर्सला चांगलेच उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे. 'तुम्ही या मुलांचं गाणं ऐकून काय केलं असतं? शांत बसला असतात का ?' मृण्मयीने दिलेले सडतोड उत्तर वाचून अनेकांनी प्रतिक्रिया देत मृण्मयीलाच सपोर्ट केल्याचे पाहायला मिळत आहे. तर काहींनी जुनेच पर्व चांगले असल्याचे म्हणत त्यावेळी सुत्रसंचालन करणारी पल्लवी जोशीची आठवण काढताना दिसले होते.

Web Title: Mrunmayee Deshpande Comments on trollers, says trollers business runs on our show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.