माझा होशील ना... मधील नायक आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 02:47 PM2020-02-21T14:47:28+5:302020-02-21T14:48:41+5:30

माझा होशील ना... या मालिकेतील नायक मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा असून या अभिनेत्रीने हिंदी मालिकेत देखील काम केले आहे.

mrinal kulkarni's don Virajas Kulkarni will play main role in zee marathi's Maza Hoshil Na | माझा होशील ना... मधील नायक आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा

माझा होशील ना... मधील नायक आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा

googlenewsNext
ठळक मुद्देमाझा होशील ना... या मालिकेतील नायकाचे नाव विराजस कुलकर्णी असून तो प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटात काम केले होते. 

माझा होशील ना या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे. ही मालिका कधी सुरू होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये नायक आणि नायिका एकमेकांशी निवांत गप्पा मारण्याचा प्रयत्न करत असताना नायकाच्या घरातील मंडळींचा सतत फोन त्याला येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. ही मालिका लवकरच झी मराठी या वाहिनीवर सुरू होणार आहे. झी मराठी या वाहिनीवर गेल्या काही महिन्यांपासून स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून तिची जागा ही नवी मालिका घेणार आहे.

माझा होशील ना... या मालिकेतील नायक आणि नायिका दोघे देखील प्रेक्षकांना भावत आहेत. या मालिकेतील नायिका ही गौतमी देशपांडे असून ती प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे. तिने याआधी सोनी मराठीच्या सारे तुझ्याचसाठी या मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. माझा होशील ना... या मालिकेतील नायक तर मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा आहे. 

माझा होशील ना... या मालिकेतील नायकाचे नाव विराजस कुलकर्णी असून तो प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटात काम केले होते. 

माझा होशील ना... या मालिकेत विराजस आणि गौतमीसोबतच विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, सुनील तावडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: mrinal kulkarni's don Virajas Kulkarni will play main role in zee marathi's Maza Hoshil Na

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.