बॉलिवूडचे मेगा स्टार मिथुन चक्रवर्ती आणि गुलशन कुमार यांच्यासोबत 'माँ कसम' चित्रपटात अभिनेत्री संगीता कपुरे झळकली होती. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले. चित्रपटाव्यतिरिक्त तिने मालिकेत देखील काम केलं आहे. सध्या ती ये रिश्ते हैं प्यार के मालिकेत निधी राजवंशची भूमिका साकारते आहे. या भूमिकेतून तिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. 


संगीताने लोकप्रिय मालिका छोटी बहू, सर्वगुण संपन्ना , सितारा, कलश एक विश्वास आणि बऱ्याच मालिकेत काम केलं आहे.  संगीता कपुरेने टीव्ही इंडस्ट्रीचा भाग म्हणून काम केले आहे आणि तिने किशोरवयातच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. 


 संगीता म्हणाली, "बॉलिवूडपेक्षा टेलिव्हिजनमध्ये काम करणं जास्त चॅलेजिंग आहे. मला असे वाटते केवळ टीव्ही इंडस्ट्रीच नाही तर कोणत्याही क्षेत्रात आपलं काम पूर्ण निष्ठेनं केले पाहिजे. मी माझ्या आयुष्यात खूप सकारात्मक आहे आणि जीवनाचा दृष्टीकोनही तसाच आहे म्हणून मला साधेपणाने काम करायला आवडते. टेलिव्हिजन या माध्यमाची खूप मागणी आहे त्यामुळे आमच्यावर खूप प्रेशर असते.  सुदैवाने मला आनंद आहे की 'ये रिश्ते हैं प्यार के' च्या सेटवर आपल्यात नेहमीच पॉझिटिव्ह वातावरण असते. या सेटवर एकमेकांना चैतन्यशील ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे आमची गर्ल गँग. ”


संगीताला वेब सिरीजकडून बर्‍याच ऑफर्स येत आहेत, पण तिच्या सध्याच्या दूरदर्शनवरील कार्यक्रम ये रिस्ते है प्यार के मधून थोडा वेळ काढणं तिला अवघड आहे.

व्यस्त वेळापत्रक असूनही तिने काही प्रोजेक्ट्सना शॉर्टलिस्ट केले आहे, ज्यावर ती काम करणार आहे.

Web Title: Mithun Chakraborty's actress Sangeeta Kapure says, "Working in a series is more challenging than a movie."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.