माझी तुझी रेशीमगाठ: मालिकेच्या लोकप्रियतेचं श्रेय मायराला; श्रेयसने सांगितलं त्यामागचं कारण

By शर्वरी जोशी | Published: September 27, 2021 04:21 PM2021-09-27T16:21:03+5:302021-09-27T16:21:55+5:30

Shreyas talpade: केवळ सव्वाचार वर्षांची असलेली ही चिमुकली प्रत्येकाशी आदराने आणि तितक्याच आत्मियतेने बोलते, असं श्रेयस सांगत होता.

mazi tuzi reshimgath tv serial popularity Credit goes to Myra say shreyas talpade | माझी तुझी रेशीमगाठ: मालिकेच्या लोकप्रियतेचं श्रेय मायराला; श्रेयसने सांगितलं त्यामागचं कारण

माझी तुझी रेशीमगाठ: मालिकेच्या लोकप्रियतेचं श्रेय मायराला; श्रेयसने सांगितलं त्यामागचं कारण

googlenewsNext
ठळक मुद्दे'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका अवघ्या काही आठवड्यांपूर्वी सुरु झाली आहे.

छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या उंच शिखरावर आहे. कलाकारांच्या उत्तम अभिनयाने सजलेली ही मालिका पहिल्या भागापासून लोकप्रिय झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे मालिकेतील दिग्गज कलाकारांसोबतच त्यातील बालकलाकार मायरा वायकुळ हीदेखील प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावरही तिच्या फॅन फॉलोअर झपाट्याने वाढत असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे 'पडद्यावर मस्तीखोर पण समंजस असलेली परी खऱ्या आयुष्यातही तशीच आहे. त्यामुळेच मायराच्या याच स्वभावामुळे मालिका लोकप्रिय होतीये, असं मत अभिनेता श्रेयस तळपदेने 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत मांडलं आहे. 

'माझी तुझी रेशीमगाठ'च्या सेटवर मायराचा सतत दंगा सुरु असतो.  केवळ सव्वाचार वर्षांची असलेली ही चिमुकली प्रत्येकाशी आदराने आणि तितक्याच आत्मियतेने बोलते, असं श्रेयस सांगत होता. याचवेळी सेटवर त्याची आणि तिची नेमकी मैत्री कशी आहे याचाही उलगडा त्याने केला आहे.

'..तर मालिकेत काम करु नका'; चित्रपटातील कामासोबत तुलना करणाऱ्यांवर श्रेयस नाराज

"आतापर्यंत मी अनेक बालकलाकारांसोबत काम केलं आहे. पण, त्या सगळ्यांपेक्षा मायरा थोडी वेगळीच आहे. खरं तर फक्त सव्वाचार वर्षांची आहे. पण प्रचंड हुशार आहे. म्हणजे तिच्या वयाच्या मानाने ती खूप समजुतदार आणि समंजस आहे. कोणतीही गोष्ट सांगितली की पटकन तिच्या लक्षात राहतं. कोणतीही नवीन गोष्ट ती लगेच आत्मसाद करते. हा कधीकधी तिच्या कलेकलेने घ्यावं लागतं. पण, आता दररोज सेटवर काम करुन तिलाही या सगळ्या कामाचा अंदाज येऊ लागला आहे", असं श्रेयस म्हणाला.

माझी तुझी रेशीमगाठ: 'या' कारणामुळे श्रेयसने घेतला मालिकेत काम करण्याचा निर्णय

पुढे तो म्हणतो, "मलाही एक लहान मुलगी आहे. त्यामुळे तिच्यासोबत सतत राहिल्यामुळे मला आता लहान मुलांसोबत नेमकं कसं वागावं हे समजू लागलंय.  म्हणूनच, मायरासोबत गट्टी करताना फारसा वेळ लागला नाही. मुळात मायराही हुशार आहे. ती पटकन इतरांमध्ये मिक्स होते. सेटवरही तिचं वागणं तसंच असतं. त्यामुळेच आमचं काम पडद्यावर छान दिसून येतं. आणि, याच ट्युनिंगमुळे आमची जोडी प्रेक्षकांना आवडते."

दरम्यान,  'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका अवघ्या काही आठवड्यांपूर्वी सुरु झाली आहे. मात्र, अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली. या मालिकेत श्रेयस तळपदेसोबत प्रार्थना बेहरे, मोहन जोशी, संकर्षण क-हाडे असे अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत.
 

Web Title: mazi tuzi reshimgath tv serial popularity Credit goes to Myra say shreyas talpade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.