Mazhi tuzhi reshimgaath: '...म्हणून विमानाला बसवल्या होत्या रेल्वेच्या खिडक्या'; श्रेयसने दिलं स्पष्टीकरण

By शर्वरी जोशी | Published: September 30, 2021 07:29 PM2021-09-30T19:29:23+5:302021-09-30T19:30:15+5:30

Mazhi tuzi reshimgaath झी मराठीवरील अनेक मालिका तुफान गाजत आहेत. त्यातलीच एक मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ.

mazhi tuzi reshimgaath after trolling shreyas talpade gave answer | Mazhi tuzhi reshimgaath: '...म्हणून विमानाला बसवल्या होत्या रेल्वेच्या खिडक्या'; श्रेयसने दिलं स्पष्टीकरण

Mazhi tuzhi reshimgaath: '...म्हणून विमानाला बसवल्या होत्या रेल्वेच्या खिडक्या'; श्रेयसने दिलं स्पष्टीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देअगदी सुरुवातीच्या काळात मालिकेत दाखवण्यात आलेल्या एका सीनमुळे ही मालिका चांगलीच ट्रोल झाली होती.

छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. यात काही मालिका अल्पावधीत लोकप्रिय होतात. तर काही मालिका मात्र प्रेक्षकांच्या पसंतीत न उतरल्यामुळे लवकर निरोप घेतात. यामध्येच सध्या झी मराठीवरील अनेक मालिका तुफान गाजत आहेत. त्यातलीच एक मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका अत्यंत कमी वेळात लोकप्रिय झाली. त्यामुळे सध्या सर्व स्तरांमधून या मालिकेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. परंतु, अगदी सुरुवातीच्या काळात मालिकेत दाखवण्यात आलेल्या एका सीनमुळे ही मालिका चांगलीच ट्रोल झाली होती. याच ट्रोलिंगवर आता श्रेयस तळपदेने उत्तर दिलं आहे. सोबतच विमानाला रेल्वेच्या खिडक्या नेमक्या का बसवाव्या लागल्या यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे.

अलिकडेच श्रेयस तळपदेने 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत या मालिकेविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी बोलत असताना मालिकेत विमानातील सीन शूट करत असताना नेमक्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं हे त्याने सांगितलं आहे. 

माझी तुझी रेशीमगाठ: सेटवर मायराचं शुटींग टाइमटेबल कसं असतं माहितीये का?

"सध्याच्या काळात कलेच्या शाखा प्रचंड विस्तारल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीय प्रत्येक चित्रपटामध्ये आजच्या काळात घडत असलेल्या घटनांचा समावेश करण्यात येत असतो. सहाजिकच तेच मालिकांमध्येही दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. परंतु, अनेकदा एखादं दृश्य किंवा घटना दाखवत असताना ती चुकीच्या पद्धतीने सादर होते. किंवा, प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे ती दिसत नाही, त्यामुळे मन खट्टू झालेले प्रेक्षक ट्रोलिंग सुरु करतात. मात्र, ट्रोलिंग करण्यापूर्वी प्रत्येकाने तो सीन नेमका कोणत्या परिस्थितीमध्ये, बजेटमध्ये शूट झालाय याची माहिती घेणंही गरजेचं आहे. आमच्या बजेटमध्ये जितकं शक्य होईल तितकं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो", असं श्रेयस म्हणाला.

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचं चित्रीकरण कुठे सुरू आहे माहितीये का?

पुढे तो म्हणतो,  "बजेटपेक्षाही आम्ही ज्या वातावरणात किंवा ऋतुमध्ये चित्रीकरण करतो ते समजून घेणं गरजेचं आहे. प्रार्थना आणि माझा चॉपरमधील सीन शूट करण्यासाठी आम्हाला परमिशन मिळाली होती. मात्र, ऋतू अनुकूल नसल्यामुळे हे शूटिंग झालं नाही. या सीनसाठी आम्ही सगळी तयारी केली होती. चॉपर सुद्धा तयार होतं. परंतु, ज्या दिवशी हा सीन शूट करण्यासाठी आम्हाला परमिशन मिळाली होती. त्याच दिवशी खूप पाऊस होता आणि पुढील काही दिवस असंच वातावरण राहिल असंही आम्हाला सांगण्यात आलं होतं." 

दरम्यान, 'जर अशी परिस्थिती असेल तर तुम्ही काय कराल?' असा प्रश्न श्रेयसने प्रेक्षकांना विचारला आहे. विशेष म्हणजे या भागासाठी मालिकेचं ट्रोलिंग झालं असलं तरीदेखील ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं.

नेमका कोणता होता तो सीन?

श्रेयस आणि प्रार्थना यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या एका सीनमध्ये ते दोघ विमानात बसल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र, या विमानाला रेल्वेच्या खिडक्या आणि सीट्स बसवण्यात आल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात आलं. त्यामुळे सर्रास प्रेक्षकांच्या नजरेत धूळ फेकली जात आहे असं म्हणत नेटकऱ्यांनी या मालिकेला आणि कलाकारांना ट्रोल केलं होतं. 
 

Web Title: mazhi tuzi reshimgaath after trolling shreyas talpade gave answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.